Home ताज्या बातम्या चेअरमन आजिनाथ हजारे यांच्या नेतृत्वाखाली जवळा परिसरातील समस्या बाबत ग्रामस्थांचे सभापती प्रा....

चेअरमन आजिनाथ हजारे यांच्या नेतृत्वाखाली जवळा परिसरातील समस्या बाबत ग्रामस्थांचे सभापती प्रा. राम शिंदे यांना साकडे ग्रामस्थांच्या मागणीची सभापती प्रा. शिंदे यांनी घेतली दखल

0
11

जामखेड न्युज ——

चेअरमन आजिनाथ हजारे यांच्या नेतृत्वाखाली जवळा परिसरातील समस्या बाबत ग्रामस्थांचे सभापती प्रा. राम शिंदे यांना साकडे

ग्रामस्थांच्या मागणीची सभापती प्रा. शिंदे यांनी घेतली दखल

जामखेड तालुक्यातील जवळा येथील सबस्टेशन साठी 5 MVA पॉवर ट्रान्सफार्मर बसविण्याबाबत विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांना चेअरमन अजिनाथ हजारे यांच्या सह जवळा जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांनी साकडे घातले आहे. सभापती प्रा शिंदे यांनी ताबडतोब जवळा सबस्टेशन येथील 5 MVA काम तातडीने सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

जामखेड तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील जवळा येथे 33 /11 के व्ही वीज उपकेंद्र असून या ठिकाणी सध्या 1 MVA क्षमतेचे दोन पावर ट्रान्सफॉर्म कार्यरत आहेत सध्या वाढती लोकसंख्या व वाढते वाढते बागायती क्षेत्र यामुळे शेतीपंपाची संख्या नवीन वीज जोडणे तसेच गावठाण व ग्रामीण भागातील वाढलेली वीज मागणी यामुळे हे उपकेंद्र सध्या पूर्ण क्षमतेपेक्षा अधिक भाराखाली आहे. 

परिणामी शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी पुरेसा दाबाने वीज मिळत नसून अनेक वेळा रात्री सिंचन करावी लागत आहे कमी होल्टेजमुळे अनेक शेतकऱ्यांच्या वीज पंप व बोरवेलच्या मोटरी जळून अनेक ठिकाणी फ्युज उडणे वारंवार वीज खंडित होणे असे प्रकार वाढले असून याचा फटका शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे या वीज उपकेंद्रांतर्गत सात फिटर येत आहेत त्यामुळे संपूर्ण परिसरात भार हा एकाच उपकेंद्रावर येत असून या ठिकाणी असणारे ट्रान्स्फर अपुरे पडत आहेत. 

तरी जवळच सब स्टेशन साठी भूमिपुत्र सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनी 5 MVA पावर ट्रान्सफर ची आवश्यकता असून या ठिकाणी तातडीने हे मंजूर करून द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा भाजपा कोषाध्यक्ष अजिनाथ हजारे यांनी आज चोंडी येथे सभापती राम शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन शेतकऱ्यासह निवेदन देण्यात आले आहे. 

यापूर्वी जवळा सबस्टेशन मध्ये 5 MVA चे काम सुरू झाले होते परंतु ते काम बंद आहे हे काम मजूर असून का बंद पडले आहे यांची दखल घेऊन ते काम तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी चेअरमन अजिनाथ हजारे, जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, जेष्ठ नेते मारूती रोडे, जवळा वि का संचालक राजेंद्र हजारे, मा उपसरपंच गौतम कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य किसन सरोदे, भाजपा युवा नेते बाजीराव गोपाळघरे, सतिश हजारे, युवा नेते संकेत हजारे यांच्या सह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

यावेळी सभापती नामदार प्रा राम शिंदे साहेब यांनी भाजपचे नेते चेअरमन अजिनाथ हजारे व शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दुरध्वनीवरून संपर्क करुन जवळा येथील सबस्टेशन मधील काम का बंद पडले आहे त्यांची चौकशी करुन ते जवळा सबस्टेशन येथील 5 MVA काम
तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!