Friday, March 13, 2026
Home ताज्या बातम्या योगिता मुकुंद नेमाने ची महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये निवड झाल्याबद्दल श्री साकेश्वर...

योगिता मुकुंद नेमाने ची महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये निवड झाल्याबद्दल श्री साकेश्वर विद्यालयात सत्कार संपन्न

0
2

जामखेड न्युज—–

योगिता मुकुंद नेमाने ची महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये निवड झाल्याबद्दल श्री साकेश्वर विद्यालयात सत्कार संपन्न

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या श्री साकेश्वर विद्यालयातील माजी विद्यार्थीनी योगिता मुकुंद नेमाने ची महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये निवड झाल्याबद्दल श्री साकेश्वर विद्यालयात सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदेव मुरूमकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच राजाभाऊ वराट, पोलीस पाटील महादेव वराट, उद्योजक प्रमोद मुरूमकर, मुकुंद नेमाने, गोकुळ लहाने, मुख्याध्यापक भरत लहाने, सुदाम वराट, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, प्रसाद होशिंग, मुकुंद वराट, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम वराट यांनी तर आभार अर्जुन रासकर यांनी मानले. यावेळी ज्ञानदेव मुरूमकर, भरत लहाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सत्काराला उत्तर देताना योगिता मुकुंद नेमाने म्हणाली की, अंगी जिद्द, चिकाटी तसेच मेहनत घेण्याची तयारी असेल तर यश मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपले करिअर करावे असा सल्ला दिला.

योगिता नेमाने हिचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळा पिंपळवाडी येथे तर पाचवी ते दहावी शिक्षण श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे झाले.

अकरावी बारावी ल. ना. होशिंग ज्युनियर काॅलेज मध्ये तर बीएस्सी पाटोदा जि. बीड येथे केली. वर्षभरापासून ती पोलीस दलात भरतीसाठी प्रयत्न करत होती.

नुकतेच ४५ दिवसांचे पासिंग आउट प्रशिक्षण सोलापूर गट क्रमांक १० मध्ये पूर्ण केले आहे. आता १७ तारखेला मुंबई येथे हजर होणार आहे. आज विद्यालयात सत्कार करण्यात आला. योगिता हि २०१२ मध्ये पाचवीत होती तर २०१७ मध्ये दहावी पास झाली. सहा वर्षे पिंपळवाडी ते साकत पायी प्रवास केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!