Saturday, March 7, 2026
Home ताज्या बातम्या जिल्हा विकास समन्वय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अंजली लक्ष्मण ढेपे यांचा खासदार...

जिल्हा विकास समन्वय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अंजली लक्ष्मण ढेपे यांचा खासदार निलेश लंके यांच्या हस्ते सत्कार

0
5

जामखेड न्युज—–

जिल्हा विकास समन्वय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अंजली लक्ष्मण ढेपे यांचा खासदार निलेश लंके यांच्या हस्ते सत्कार

गेली अनेक वर्षांपासून जामखेडच्या सामाजिक. शैक्षणिक, राजकीय व क्रीडा क्षेत्राच्या विविध पदांच्या माध्यमातून तसेच विविध शासकीय समितीच्या माध्यमातून महिलांसाठी काम करत असलेल्या महारूळी गावच्या माजी सरपंच अंजली लक्ष्मण ढेपे यांची शासनाच्या जिल्हास्तरीय जिल्हा विकास समन्वय समिती (दिशा) या समितीच्या नामनिर्देशित सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे. याबद्दल अहिल्यानगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनी त्याचा सत्कार केला.

अंजली लक्ष्मण ढेपे यांच्या घरी जाऊन खासदार निलेश लंके यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, प्रा. लक्ष्मण ढेपे, वकिल संघाचे तालुकाध्यक्ष अँड. मयूर डोके, संजय डोके, नगरसेवक राजेंद्र गोरे, संदीप (आण्णा) गायकवाड, प्रा. कैलास हजारे, आकाश घागरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ही समिती केंद्रशासन व राज्य शासनाच्या योजना राबविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करत असते. या समितीचे अध्यक्ष हे शिर्डी मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सहअध्यक्ष नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके हे आहेत. तर सचिव म्हणून जिल्हाधिकारी हे काम पाहत असतात. या समितीत सर्व प्रमुख खात्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असतो.

या समितीचे सहअध्यक्ष तथा नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या शिफारशीनुसार अंजली ढेपे यांची या समितीवर निवड करण्यात आली आहे. जामखेड दौऱ्यावर असताना खासदार निलेश लंके यांनी ढेपे यांच्या घरी जात त्यांचा सत्कार केला.

श्रीमती अंजली ढेपे यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या माजी तालुकाध्यक्ष, महारूळी गावच्या माजी सरपंच म्हणून काम केले असून सध्या त्या दक्षता समितीच्या तालुकाध्यक्ष, महिला समुपदेशन केंद्राच्या अध्यक्षा, तालुका विधि समितीच्या सदस्या व जामखेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सचिव अश्या पदांवर काम करत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे.

अंजली लक्ष्मण ढेपे यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्याची दखल घेत खासदार निलेश लंके यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे. आज त्यांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!