Home ताज्या बातम्या शाळा गुणवत्ता मूल्यांकनामध्ये ल ना होशिंग विद्यालयास अ + श्रेणी अ+...

शाळा गुणवत्ता मूल्यांकनामध्ये ल ना होशिंग विद्यालयास अ + श्रेणी अ+ श्रेणी मिळविणारे तालुक्यातील एकमेव विद्यालय

0
5

जामखेड न्युज—–

शाळा गुणवत्ता मूल्यांकनामध्ये ल ना होशिंग विद्यालयास अ + श्रेणी

अ+ श्रेणी मिळविणारे तालुक्यातील एकमेव विद्यालय

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने माध्यमिक शाळांचे मूल्यांकन करण्यात आले असून सदर मूल्यांकनामध्ये जामखेड येथील ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयस अ+ श्रेणी प्राप्त झालेली असून अ + श्रेणी मिळविणारे हे तालुक्यातील एकमेव विद्यालय ठरले आहे.

शाळांची गुणवत्ता उंचावणे, संस्थात्मक सुधारणा करणे आणि पारदर्शकता आणणे या उद्देशाने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत माध्यमिक शाळांच्या गुणवत्तेचे स्वमुल्यांकन आणि बाह्य मूल्यांकन करण्यासाठी शासनाने एक व्यापक मानकीकृत आराखडा तयार केलेला आहे. त्यानुसार शाळांचे मूल्यांकन करण्यात आले होते.

त्यामध्ये अ + श्रेणी मिळवणारे ल. ना. होशिंग विद्यालय हे तालुक्यातील एकमेव विद्यालय ठरले आहे. दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना 1951 साली झाली व स्थापनेबरोबरच या संस्थेने या विद्यालयाची सुरुवात केली. संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षां मध्ये हे यश मिळवून ल. ना. होशिंग विद्यालयाने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ल. ना. होशिंग विद्यालय हे केवळ एक विद्यालय न राहता तालुक्यातील माध्यमिक शिक्षणासाठीचे मार्गदर्शन केंद्र झालेले आहे.

तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांना मार्गदर्शन करणे त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम हे विद्यालय अनेक वर्षापासून सातत्याने करीत आलेले आहे. विद्यालयात अनेक नवनवीन उपक्रम राबविले जातात व ते तालुक्यातील माध्यमिक शाळांसाठी प्रेरक ठरत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात पहिली गणित लॅब सुरू करण्याचे श्रेय याच विद्यालयात जाते. विद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदीप्यमान यश मिळवलेले असून विद्यालयाने अ + श्रेणी मिळवून तालुक्यातील सर्वोत्कृष्ट विद्यालयाचा मान मिळवल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक बी ए पारखे व त्यांच्या सर्व स्टाफचे संस्थेचे अध्यक्ष उद्धव बापू देशमुख, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सेक्रेटरी अरुण चिंतामणी, माजी सेक्रेटरी शशिकांत देशमुख व सर्व संस्था चालकांनी अभिनंदन केले आहे.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेस 75 वर्ष पूर्ण होत असून आज पर्यंत ल. ना.होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाने सर्वच क्षेत्रात नामवंत गुणवंत विद्यार्थी घडविले आहेत. विद्यालयास अ + श्रेणी मिळवून देण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य, उपमुख्याध्यापक उपप्राचार्य पर्यवेक्षक सर्व अध्यापक- प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुख सर्व आजी-माजी विद्यार्थी, पालक बंधू भगिणी सर्वांचे योगदान| महत्वपूर्ण असून संस्थेच्या वतीने या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि भविष्यात देखील विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा व गुणवत्ता अशीच वृद्धींगत रहावी यासाठी खूप खूप शुभेच्छा ” असे संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख यांनी म्हटले आहे.

विद्यालयास प्राप्त पुरस्कार –

1. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
भाग- 1 तालुक्यात प्रथम(तीन लाख रुपये पारितोषिक प्राप्त )
2. संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान प्रथम
2005

3. नाम फाउंडेशन पाणी आडवा पाणी जिरवा या स्पर्धेतील योगदानाबद्दल स्मृतिचिन्ह 2018

4. परस बाग स्पर्धा तालुका पातळीवर प्रथम क्रमांक

5. जिल्हा गणित विज्ञान पर्यावरण प्रदर्शन 2012-13 उत्कृष्ट आयोजनाबद्दल सन्मानचिन्ह

6. महाराष्ट्र शासन 11वा राष्ट्रीय मतदार दिन अभियान प्रशस्तीपत्र -2021

विविध स्पर्धामध्ये यश-

1. क्रीडा स्पर्धांमध्ये राज्य व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर शानदार कामगिरी
2. भारतीय सैन्य दल महाराष्ट्र पोलीस, राज्य राखीव पोलीस दल व तत्सम सेना दलात दरवर्षी अनेक विद्यार्थी भरती

विद्यालयातील सुविधा ->
विद्यालय भौतिक सुविधांनी सज्ज,
★ तज्ञ अनुभवी व तंत्रस्नेही अध्यापक वर्ग, उत्कृष्ट दर्जाचे क्रीडांगण, आधुनिक संगणक कक्ष व ई लर्निंग सुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा व ग्रंथालय नवीन सर्व सुविधायुक्त अटल लॅबची सुसज्ज उभारणी.

शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा –
एस.एस. सी व एच. एस.सी परीक्षेचा प्रत्येक वर्षी उत्कृष्ट निकाल
★ एन. एम. एम. एस परीक्षेत दरवर्षी अनेक विद्यार्थी पात्र व त्यांना स्कॉलरशिप विद्यालयातील नाविन्यपूर्ण उपक्रम -> राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. अ. ल. देशमुख (शिक्षण तज्ञ पुणे ) यांच्या मार्गदर्शनानुसार गुणवत्ता वाढ व विकास प्रकल्प. विद्याथ्र्यांसाठी पतपेढी योजना, विद्यार्थी दत्तक पालक योजनागाडूळ खत प्रकल्प.

दरवर्षी शाळा स्तरीय भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी
एन सी सी युनिट आर एस पी युनिट, राष्ट्रीय हरित सेना,स्काउट गाईड, दुर्मिळ वनस्पतीनी बनवलेले बॉटनिकल गार्डन. स्वतंत्र गणित विषयासाठी गणित लॅब.आदर्श व्यायाम शाळा व जिमची मुला-मुलींसाठी स्वतंत्र सुविधा .

विविध कलात्मक वस्तू, बागकाम शिल्पकला पेंटिंग, कागदी ओरिगामी कला, मॉडर्न आर्टइ. प्रशिक्षण

दरवर्षी क्षेत्रभेटीचे आयोजन.

पुणे येथील नामांकित विषय तज्ञांचे मार्गदर्शन व व्याख्यानमालांचे आयोजन .आदर्श विद्यार्थी आदर्श विद्यार्थिनी आदर्श खेळाडू इत्यादी दरवर्षी पुरस्कार ज्ञानदीप हस्तलिखित अंकांचे दरवर्षी प्रकाशन,

अशा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यालयास अ + श्रेणी मिळाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!