Saturday, February 28, 2026
Home ताज्या बातम्या नोकरीत स्पर्धा तर उद्योग व व्यवसायात मोठ्या संधी – उद्योगपती सागर अहिवळे...

नोकरीत स्पर्धा तर उद्योग व व्यवसायात मोठ्या संधी – उद्योगपती सागर अहिवळे दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासात उद्धव बाप्पूंचा मोठा वाटा पहा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कोणी पटकावले क्रमांक

0
2

जामखेड न्युज—–

नोकरीत स्पर्धा तर उद्योग व व्यवसायात मोठ्या संधी – उद्योगपती सागर अहिवळे

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासात उद्धव बाप्पूंचा मोठा वाटा

पहा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कोणी पटकावले क्रमांक

सरकारी आणि खासगी क्षेत्रांमध्ये नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. तर दुसऱ्या बाजूला उद्योग व व्यवसायात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न धावता स्वत:मधील उद्योजकाचा शोध घ्यावा व उद्योजक बनावे असे आवाहन प्रसिद्ध उद्योगपती सागर अहिवळे यांनी केले.

जामखेड महाविद्यालय जामखेड येथे स्वा.सै.कै. मधुकाका देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, प्रमुख पाहुणे सागर अहिवळे तसेच दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरूणशेठ चिंतामणी, माजी सचिव शशिकांत देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख, संचालक डॉ. प्रताप गायकवाड, डॉ. सुनील कटारिया, दिपक होशिंग, प्राचार्य बी. ए. पारखे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सागर अहिवळे म्हणाले की,
उद्योजक बनण्याची स्वप्ने पहावीत.विकासाचा विचार आत्मसात करावा. मी उद्योजक बनणार, दुसऱ्यांना रोजगार देणार असा निर्धार करा आणि माझ्याकडे या. मी तुम्हाला स्वावलंबी बनवण्याची जबाबदारी स्वीकारतो अंगी जिद्द, चिकाटी व मेहनत घेण्याची तयारी हवी, अंगी शिस्त हवी, वेळेचे नियोजन केले पाहिजे. सध्याची तरुणाई मोबाईल मध्ये आपण अडकत चालली आहे.

सोशल मीडिया प्रगतिसाठी वापरणे योग्य आहे पण सध्या अतिरेक होत चालला आहे. एआय मुळे अनेकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. पण उद्योजकाला फरक पडणार नाही तर खूप मोठ्या संधी आहेत. असेही सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुनील पुराणे यांनी करताना सांगितले की, देशमुख कुटुंबीयांकडे दातृत्व आहे. शिक्षणाचे महत्त्व 75 वर्षापूर्वीच त्यांनी ओळखले म्हणून आज दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने हा वटवृक्ष झाला आहे.

यावेळी बोलताना लक्ष्मीकांत देशमुख यांनी सागर अहिवळे यांची ओळख करून देताना सांगितले की, विद्यार्थी दशेत वक्तृत्व स्पर्धेची सवय लागावी म्हणून ही स्पर्धेचे आयोजन करण्यात येते भाषण कलेचे सामर्थ्य खूप मोठे आहे. शुन्यातून विश्व निर्माण करणारे प्रमुख वक्ते अहिवळे आहेत.

यावेळी सर्वांना उद्धवराव देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या व आभार प्रा. अविनाश फलके यांनी मानले.

वक्तृत्व स्पर्धेतील क्रमांक पुढीलप्रमाणे आले

प्रथम क्रमांक यश रविंद्र पाटील (मुंबई विद्यापीठ मुंबई ) यास ७००१/- स्मृती चिन्ह+ सन्मानपत्र

व्दितीय क्रमांक संकेत कृष्णात पाटील (शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज कोल्हापूर यास ५००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र

तृतीय क्रमांक अनिकेत रामा वनाटे (संभाजी महाविद्यालय, नागपुर) ३००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र

उत्तेजनार्थ – १: —- गेळे दिक्षा बबन डी.पी. कॉलेज कर्जत ) १००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र

उत्तेजनार्थ – २ : —— किंबहुने अक्षता विनायक
१००१/- स्मृती चिन्ह + सन्मानपत्र

अशा प्रकारे स्पर्धकांनी क्रमांक पटकावले तर
परिक्षक पत्रकार व संपादक भुषण देशमुख, प्रा. स्वप्नील म्हस्के, डॉ मटके पी. आर यांनी काम पाहिले. आभार प्रा. अविनाश फलके यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!