Wednesday, February 18, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड नगरपरिषदेच्या वतीने खर्डा चौकात शिवजयंती सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने...

जामखेड नगरपरिषदेच्या वतीने खर्डा चौकात शिवजयंती सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी

0
2

जामखेड न्युज——

जामखेड नगरपरिषदेच्या वतीने खर्डा चौकात शिवजयंती

सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी

 

जामखेड नगरपरिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा यांच्या संकल्पनेतून जामखेड नगरपरिषदच्या वतीने खर्डा चौक येथे भव्य दिव्य स्वरूपात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. तरी सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष प्राजंल अमित चिंतामणी यांनी केले आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जामखेड शहरात शिवजयंती सोहळा संपन्न होत आहे. जामखेड परिसरातील अवघा माहोल भगवा झाला असून परिसरात शिवजयंती निमित्त विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जामखेड नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रांजळ अमित चिंतामणी यांच्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, विचार आणि राष्ट्रनिष्ठेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रांजळ अमित चिंतामणी यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

शिवजयंती सोहळ्यासाठी जामखेड परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन नगराध्यक्ष प्रांजळ अमित चिंतामणी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!