विंचरणा नदीकाठी असलेल्या स्वयंभू तपनेश्वर महादेव मंदिर परिसरात नमो उद्यानासाठी प्रयत्न करणार – उपनगराध्यक्ष पोपट राळेभात
स्वयंभू तपनेश्वर महादेव मंदिर विंचरणा नदीच्या काठी येथे नमो उद्यानासाठी होणे साठी प्रयत्न करू असे आश्वासन उपनगराध्यक्ष पोपट राळेभात यांनी दिले. महाशिवरात्री निमित्त स्वयंभू तपनेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी महाशिवरात्रीच्या निमित्ताने विंचारणा नदीकाठी वसलेल्या पुरातन स्वयंभू तपनेश्वर महादेव मंदिर येथे दि पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती .
“हर हर महादेव”च्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.दि १३ते १५ तीन दिवस शिवलिला अमृत ग्रंथाचे पारायण ह भ प पंढरीनाथ राजगुरू यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे यावेळी पारायणासाठी महिलांची संख्या मोठी होती.
तसेच यावेळी दि १५रोजी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पोपट राळेभात पती पत्नी व नगरसेविका वषाँ कैलास माने व शिवसेना तालुकाप्रमुख कैलास माने तसेच आ रोहित पवार यांचे स्विय सहायक सचिन मोकाशी व पत्नी चैताली सचिन मोकाशी या तीन जोडप्यांचा हस्ते विधीवत पुजा करण्यात आली आहे.
यावेळी मंदिर समितीचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख कैलास माने यांनी भाषणात सुचविले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्या मार्फत राज्यातील प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायत च्या विकासासाठी नमो उद्यान बनविण्यासाठी एक कोटी निधी दिला आहे.
त्यामुळे येथील पुरातन स्वयंभू तपनेश्वर महादेव येथे नमो उद्यान मंजूर करावे अशा प्रस्ताव आपल्या भाषणात मांडला याचा दूजोरा देत उपनगराध्यक्ष राळेभात यांनी सांगितले की निश्चित या मंदीरासाठी नमो उद्यानासाठी आवश्यक प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे हे मंदिर पुरातन असुन या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर भाविकांची संख्या वाढत आहे हे या परिसरातील नागरिकांसाठी फिरण्याचा प्रश्न मिटणार आहे तरी येथील भाविकांची मागणी आहे येथे उद्यान व्हावे या संदर्भात नगरपरिषदेची बैठक दि १८ रोजी होणार आहे यासाठी या परिसराचे नगरसेवक राजेंद्र गोरे हे विषय मांडणार आहेत.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास शुभंम जाधव नगरसेवक प्रवीण होळकर शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना ईस्साईल सय्यद यांचा सत्कार करण्यात आला आहे महाशिवरात्रीचे औचित्य साधून भाविकांनी पहाटेपासून रांगा लावत भगवान महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी महाभिषेकासह अभिषेक, बेलपत्र अर्पण आणि विशेष पूजाविधी करण्यात आले.
भाविकांनी कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, त्यामुळे रात्रीच्या वेळी परिसर उजळून निघाला.
तसेच भाविकांसाठी प्रसादाचे वितरण करण्यात आले असून हजारो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. दिवसभर भजन-कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समिती व स्वयंसेवकांनी केलेल्या नियोजनामुळे दर्शन व्यवस्था सुरळीत पार पडली. महाशिवरात्रीनिमित्त परिसरात दिवसभर उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमासाठी जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक राजेंद्र गोरे,अशोक माने,दत्तात्रय उतेकर, शिवाजी काळदाते, मिठूलाल नवलाखा,गणपत बनगे,भाऊ परदेशी,अविनाश वाघमारे, विकास चव्हाण,मनोज बोळे, साईनाथ जाधव, संतोष माने,लखन क्षिरसागर, विकास परदेशी,अक्षय माने,पुजारी नंदू गुरव,मगन चव्हाण, गोविंद साठे आदींनी परिश्रम घेतले.