जामखेड न्युज—–
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड “पुरस्काराबद्दल आनंदराव देशमुख यांचा जामखेड महाविद्यालयात सत्कार संपन्न
जामखेडकरांच्या ‘शिरपेचात मानाचा तुरा

जामखेड महाविद्यालया च्या वतीने प्रसिद्ध निवेदक श्री आनंदराव देशमुख यांचा “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड “पुरस्काराबद्दल सत्कार आज दिनांक १७/०२/ २०२६ रोजी जामखेड महाविद्यालय, जामखेड येथे प्रसिद्ध आकाशवाणी निवेदक मा .श्री आनंद देशमुख सौ. कुंदाताई देशमुख यांचा महाविद्यालयाचे वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. सुनील पुराणे यांनी केले. जामखेड सारख्या दुष्काळी दुर्गम भागात जन्मलेले आनंद देशमुख यांना ब्रिटिश पार्लमेंटचा “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस”लंडन हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारांने जामखेडकरांच्या ‘शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवण्याचे काम केले आहे.

त्यांना भारतातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील सलग 33 वर्ष निवेदनाबाबत ब्रिटिश पार्लमेंटने पुरस्कृत केलेला पहिला पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने देखील त्यांना “जिंदादिल “पुरस्कार प्रदान केला आहे.

त्याचबरोबर अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. 33 वर्ष सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात निवेदक व पुरस्कार प्राप्त झाल्यानंतरचा 33 वा सत्कार त्यांचा ते ज्या संस्थेत शिकले त्या संस्थेच्या महाविद्यालयात होणे हा योगायोग आज जुळून आला.

महाविद्यालयासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण असून एवढ्या मोठ्या कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान करण्याची संधी माजी सचिव श्री शशिकांत देशमुख यांच्या माध्यमातून महाविद्यालयाला प्राप्त झाली याचा खूप आनंद वाटत असल्याचे प्राचार्य डॉ. पुराणे यांनी म्हटले.

संस्थेचे विद्यार्थी असलेले श्री. आनंद देशमुख यांचे नाव संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये वर्ल्ड बुक रेकार्ड, लंडन मध्ये नोंदविले गेले ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. अशा प्रकारचे जागतिक रेकार्ड प्रस्थापित करणारे ते जामखेड तालुक्यातील पहिले व्यक्ती असल्याचे सांगून संस्थेचे माजी सेक्रेटरी शशिकांत देशमुख यांनी हा त्यांच्या बरोबरच संस्थेच्या दृष्टीनेही अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले.

ते आकाशवाणी मध्ये २४ वर्ष निवेदक तथा कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत होते. गेली ५७ वर्षे ते निवेदक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ. कुंदाताई यांनी प्रत्येक कार्यक्रमाच्या बारीक-सारीक नोंदी ठेवल्या आहेत आणि सध्या त्या त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या नियोजनाची धुरा सांभाळतात. याप्रसंगी कुंदाताई यांनी श्री. आनंदजी यांचा जीवनपट उलघडणारे आत्मचरित्र लिहिण्याचा संकल्प केला.




