Saturday, April 11, 2026
Home ताज्या बातम्या वामनभाऊ मंदिर बांधकामासाठी युवा नेते काकासाहेब गर्जे यांच्या कडून दोन लाख 21...

वामनभाऊ मंदिर बांधकामासाठी युवा नेते काकासाहेब गर्जे यांच्या कडून दोन लाख 21 हजारांची देणगी मोहा ग्रामस्थांच्या वतीने गर्जे यांचा सत्कार

0
64

जामखेड न्युज—–

वामनभाऊ मंदिर बांधकामासाठी युवा नेते काकासाहेब गर्जे यांच्या कडून दोन लाख 21 हजारांची देणगी

मोहा ग्रामस्थांच्या वतीने गर्जे यांचा सत्कार

 

 

सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणारे युवा नेते यांनी तालुक्यातील मोहा येथील वामनभाऊ मंदिर बांधकामासाठी दोन लाख एकवीस हजार रुपयांची देणगी जाहीर केली आहे. त्याच्या या सामाजिक व धार्मिक दातृत्वाबद्दल मोहा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मोहा येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोहा ग्रामपंचायत चे सरपंच भीमराव कापसे, माजी सरपंच शिवाजी डोंगरे, मंगेश आजबे, वामन डोंगरे यांच्या सह अनेक ग्रामस्थ हजर होते.

काकासाहेब गर्जे हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच सभापती प्रा राम शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. प्रत्येकाच्या सुख दु:खात ते हजर असतात. तसेच आपल्या सामाजिक कामाच्या बळावर एक वेगळा ठसा निर्माण केला आहे.

तालुक्यातील अनेक धार्मिक कार्यक्रमास तसेच अखंड हरिनाम सप्ताहामध्ये उदार अंत:करणाने मदत करत असतात. जमादारवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पन्नास किलो साखर दिली होती. तसेच सप्ताहामध्ये कार्यक्रम पत्रिका तसेच अन्नदानासाठी मदत करत असतात.नाणेवाडी येथे बाळूमामा सप्ताहामध्ये शेवटची पंगत दिली होती. 

काकासाहेब गर्जे हे जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असताना आपल्या कामाचा आगळावेगळा ठसा उमटवला होता.

तसेच काकासाहेब गर्जे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील नाहुली सेवा संस्था निवडणूकीत संपूर्ण पॅनलने घवघवीत यश संपादन केले होते. सामाजिक कामाबद्दल गर्जे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

काकासाहेब गर्जे यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!