Home ताज्या बातम्या शिवमहापुराणातून जीवनाला दिशा – ह.भ.प.रामायणाचार्य बाबा (महाराज) ढवळे तपनेश्वर महादेव मंदिरात...

शिवमहापुराणातून जीवनाला दिशा – ह.भ.प.रामायणाचार्य बाबा (महाराज) ढवळे तपनेश्वर महादेव मंदिरात शिवपुराण कथेची भक्तीमय वातावरणात सांगता

0
7

जामखेड न्युज—-

शिवमहापुराणातून जीवनाला दिशा – ह.भ.प.रामायणाचार्य बाबा (महाराज) ढवळे

तपनेश्वर महादेव मंदिरात शिवपुराण कथेची भक्तीमय वातावरणात सांगता

शहरातील तपनेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त ११ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या पाच दिवसांत शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले. आज रोजी भक्तिमभावाने या शिवपुराण कथेचे व महाप्रसादाने सांगता झाली.

यावेळी ह.भ.प.रामायणाचार्य बाबा (महाराज) ढवळे (हळगावकर), ह.भ.प.कृष्णा महाराज, ह.भ.प.रविंद्र महाराज यांच्या प्रभावी वाणीने उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले.

यावेळी ह.भ.प. रामायणाचार्य बाबा ढवळे यांनी प्रभावी उपदेश करताना सांगितले की, इतिहासातील कठीण काळात अनेक शिवमंदिरे उद्ध्वस्त झाली; परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य रक्षणासाठी स्वतःचे जीवन अर्पण केले.

त्यांच्या विचारांचे, शौर्याचे आणि संस्कारांचे अनुकरण आजच्या पिढीने करणे ही काळाची गरज आहे. देशासमोर विभाजनाच्या आणि मतभेदांच्या छाया दाटत असताना हिंदू समाजाने एकजुटीने उभे राहणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, आजच्या गतिमान युगात सर्वांना वेदशास्त्रांचा सखोल अभ्यास करणे शक्य नसले तरी पुराणातील कथा सर्वसामान्यांना सहज समजतात.

या कथांमधून जीवनातील वेदना सहन करण्याची शक्ती, धैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळतो. शिवमहापुराण हे केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक आहे. खरे ज्ञान प्राप्त झाल्यावर कर्तृत्वाचा अहंकार नाहीसा होतो आणि माणूस अधिक संयमी, सजग व मूल्यनिष्ठ बनतो.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.तपनेश्वर महादेव मंदिर समिती सेवा मंडळाचे सेवेकरी आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास ग्रामस्थ भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!