जामखेडमध्ये शिवजयंती उत्सवानिमित्त शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सुरूवात
गेल्या सात वर्षापासून शिवगर्जना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित वैकुंठवासी कमलबाई पांडुरंग चौधरी ( पाटलीन बाई) यांच्या स्मरणार्थ शिवगर्जना भक्ती महोत्सव शिवजयंती उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी या अमृततुल्य किर्तन व ज्ञानेश्वरी पारायणाचा लाभ घ्यावा असे आवाहन निमंत्रक पंकज सदाशिवशेठ चौधरी यांनी केले आहे.
ह. भ. प. भागवताचार्य स्वामी गोरक्षनाथ महाराज भिलारे यांचे सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक असतील
सात दिवस पुढील मान्यवर महाराजांची किर्तन सेवा आहे.
बुधवार दि. ११ फेब्रुवारी रोजी हभप भागवताचार्य स्वामी गोरक्षनाथ महाराज भिलारे यांचे किर्तन झाले तसेच गुरूवार दि. १२ रोजी हभप रामायणाचार्य शरद महाराज फसाटे यांचे किर्तन झाले.
शुक्रवार दि. १३ रोजी हभप सोमनाथ महाराज कर्डिले माजलगाव यांचे किर्तन होईल.
शनिवार दि. १४ रोजी हभप शिवचरित्रकार किरण महाराज मोटे गेवराई, रविवार दि. १५ रोजी हभप महाशिवपुराणाचार्य नवनाथ महाराज नाईकवाडे वडवणी, सोमवार दि. १६ रोजी हभप विजय महाराज नेहरे आळंदी देवाची, मंगळवार दि. १७ रोजी हभप विनोदिचार्य सिद्धेश्वर महाराज बागलाने, बुधवार दि. १८ रोजी हभप महंत भानुदास महाराज शास्त्रीजी श्रीराम संस्थान गोयळवाडा अशा प्रकारे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची किर्तने होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी गायनाचार्य संगीत अलंकार हभप मुकुंद महाराज भवर, हभप प्रथमेश महाराज देवकाते आहेत
तर मृदंगाचार्य मृदंगविशारद अविराज महाराज वटाणे, आळंदी देवाची विठ्ठल मंदिर भजनी मंडळ, नागेश्वर भजनी मंडळ असणार आहेत.