Thursday, February 5, 2026
Home शैक्षणिक बातम्या सारोळा प्रशालेतील विद्यार्थांनी गाजवले अहिल्यानगरचे मैदान

सारोळा प्रशालेतील विद्यार्थांनी गाजवले अहिल्यानगरचे मैदान

0
2

जामखेड न्युज——-

सारोळा प्रशालेतील विद्यार्थांनी गाजवले अहिल्यानगरचे मैदान

         

 

शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने गुरुवार,दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी त्रिमूर्ती क्रीडा संकुल,नेवासा फाटा या ठिकाणी मोठ्या गटाच्या (इ.६ वी ते इ.८ वी) जिल्हास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धा संपन्न झाला.

सदर स्पर्धेत सारोळा प्रशालेतील विद्यार्थांनी सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात नेत्रदिपक कामगिरी केली. यामध्ये कु.तनुजा भरत सांगळे हिने मुलींचा मोठा गट मधून उंच उडी या वैयक्तिक क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक संपादन केला.

तसेच सारोळा प्रशालेतील इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गाच्या मोठ्या गटातील मुलांच्या कबड्डी संघाने उपविजेतेपद मिळविले.

सदर संघामध्ये रोहित संजय गव्हाळे (कर्णधार), पवन दादासाहेब जगदाळे,महेश बाळासाहेब काशिद, संभव सुनिल बहिर, सार्थक राजेंद्र समुद्र, माऊली लहू जगदाळे, अनिकेत अशोक येवले, प्रितम परमेश्वर हुलगुंडे, कार्तिक गणेश काशिद,राजेश रामनाथ सांगळे,उत्कर्ष संतोष मुळे व दिगंबर कल्याण कोकाटे या विद्यार्थांनी सहभाग नोंदवला.जामखेड विरुद्ध कोपरगाव मध्ये झालेल्या अंतिम रोमहर्षक सामन्याचा सर्व अधिकारी,शिक्षक व खेळाडू यांना आनंद लुटला.

वरील सर्व यशस्वी क्रीडा स्पर्धकांचे जिल्हा परिषद अहिल्यानगरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सन्माननीय भास्कर पाटील साहेब,जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रदिप चव्हाण ,विस्तार अधिकारी जालिंदर खताळ , केंद्रप्रमुख विक्रम बडे ,आदर्श सारोळा गावाचे आदर्श सरपंच रितुताई अजयदादा काशिद ,शाळा व्यवस्थापन समिती सारोळा अध्यक्ष सतीश मुळे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे तसेच सर्व सदस्य यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले.व भविष्यातील उज्ज्वल क्रीडा वाटचाली करिता विद्यार्थ्यांना मनस्वी शुभेच्छा दिल्या.

सदर स्पर्धकांना सारोळा प्रशालेचे मुख्याध्यापक माजीद शेख सर,पदवीधर शिक्षक राहुल लिमकर सर, सुरेश बर्वे सर उपाध्यपक प्रशांत होळकर सर,उपाध्यापिका शबाना शेख मॅडम, वृषाली खांदवे मॅडम व अमृता रसाळ मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!