Sunday, February 1, 2026
Home ताज्या बातम्या हस्ताक्षर (लेखन) प्रकारात श्रीरुद्र संतोष घोलप जिल्ह्यात दुसरा क्रमांक

हस्ताक्षर (लेखन) प्रकारात श्रीरुद्र संतोष घोलप जिल्ह्यात दुसरा क्रमांक

0
5

जामखेड न्युज——

हस्ताक्षर (लेखन) प्रकारात श्रीरुद्र संतोष घोलप जिल्ह्यात दुसरा क्रमांक

३१ जानेवारी २०२६ रोजी अहिल्यानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत हस्ताक्षर (लेखन) या प्रकारात किशोर गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवस्ती शिऊर, ता.जामखेड शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी श्रीरुद्र संतोष घोलप याने अहिल्यानगर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.

त्याच्या या यशात श्रीमती पिंपरे मॅडम, श्री.संतोष भोंडवे सर,श्री.निंबाळकर सर, यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले.

श्रीरुद्रचे वडील नवीन मराठी प्राथमिक शाळा जामखेड येथे शिक्षक असून हस्ताक्षर सुधारणेवर श्री अक्षरसिद्धी सुंदर हस्ताक्षर वर्ग यामाध्यमातून काम करत आहेत.

यावेळी जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण, विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, केंद्रप्रमुख विक्रम बडे, भाजपा शहर मंडलाध्यक्ष तथा नगरसेवक संजय काशिद, उद्योगपती उमेश माळवदकर, नितीन शास्त्रकार यांनी श्रीरुद्रचे अभिनंदन केले.

श्रीरुद्र ने संपादन केलेल्या यशाबद्दल पंचक्रोशीतून, तालुक्यातून तसेच समस्त जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!