Home ताज्या बातम्या दहा किलो गांजासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, जामखेड तालुक्यात एकच खळबळ ...

दहा किलो गांजासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, जामखेड तालुक्यात एकच खळबळ स्थानिक गुन्हे शाखा व खर्डा पोलीसांची संयुक्त कारवाई

0
8

जामखेड न्युज——

दहा किलो गांजासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, जामखेड तालुक्यात एकच खळबळ

स्थानिक गुन्हे शाखा व खर्डा पोलीसांची संयुक्त कारवाई

जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील तरडगाव फाटा येथे स्थायिक गुन्हे शाखा व खर्डा पोलीसांनी संयुक्त कारवाई करत सापळा लावून विक्री करता घेवुन जात असलेले ९.८५४ किलो ग्रॅम गांजासह एकुण ३,४६,४७५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याच्या दिलेल्या आदेशानुसार
अंमली पदार्थ विरोधी टास्क फिर्सचे नोडल अधिकारी तथा पो. नि. श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत पोउपनि / अनंत सालगुडे, समीर अभंग, पोलीस अंमलदार, ह्रदय घोडके, संतोष खैरे, गणेश लबडे, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, चालक महादेव भांड यांना रवाना केले.

सदर पथक हे खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थबाबत माहिती घेत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत एक इसम त्याचेकडील हिरो कंपनीची सी. डी. डिलक्स मोटार सायकल क्रमांक एम.एच.१६बी. २५५० हिवरुन अंमली पदार्थ गांजा घेवुन विक्री करीता तरडगांव फाटा येथुन तरडगांव गावचे दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाली.

सदरची बातमी पोनि कबाडी यांना कळविले असता त्यांनी खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने तात्काळ खर्डा पोलीस स्टेशन येथे जावुन सपोनि उज्वलसिंह राजपुत यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता त्यानुसार सपोनि उज्वलसिंह राजपुत व पोलीस अंमलदार संभाजी शेंडे, शेषराव म्हस्के, बाळु खाडे, धनराज बिराजदार, शकिल बेग नेम. खर्डा पोलीस स्टेशन सह कारवाई करण्याकरीता आवश्यकत्या साहित्या सह पोलीस स्टेशन मधुन सरकारी व खाजगी वाहनाने निघुन तरडगाव फाटा ता. जामखेड येथे जावुन सापळा रचुन थांबले असतांना बातमीतील नमुद मोटार सायकल तरडगांव ते तरडगांव फाट्याचे दिशेने येतांना दिसली.

तेव्हा बातमीतील हकिगती प्रमाणे खात्री झाल्याने पथकाने मोटार सायकल थांबवुन त्यांना सपोनि / उज्वलसिंग राजपुत यांनी पोलीस स्टाफ, पंचाची ओळख समजावुन सांगुन त्यांचे नांव पत्ता विचारले असतांना त्यांनी त्यांचे नांवे १) सचिन नवनाथ गायकवाड वय- २५ वर्षे रा. पिंपरखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर, २) सुक्षय उर्फ सोमा सुनिल काळे,वय २३ वर्षे रा. खर्डा, ता. जाखेड, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. तेव्हा सपोनि / उज्वलसिंग राजपुत यांनी मिळालेल्या बातमीची हकिगत सांगुन त्यांचे व मोटार सायकलची झडती घेतली मोटार सायकल वरील गोणी मध्ये उग्र वास येत असलेला व मिश्रीत असलेला हिरवट रंगाचा पाला, फुले, बोंडे, बिया असे संलग्न असलेले वनस्पतीचे शेंडे असलेला गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळुन आला असुन त्याबाबत ताब्यातील इसमांकडे विचारपुस करता त्याने इसम नामे ३) सुभम घुंगरे रा. माहीजळगांव ता. कर्जत जि. अहिल्यानगर (फरार) यांचेकडुन विक्री करीता आणलेला असल्याचे सांगितले.

नमुद आरोपीचो ताब्यातुन २,४५,४७५/- रु कि.चा ९.८५४ कि. ग्रॅम अंमली पदार्थ गांजा,३०,०००/- रु कि.चे दोन मोबाईल, १०००/- रु कि.चे रोख रक्कम, ७०,०००/- रु कि.चा एक मोटार सायकल असा एकुण ३,४६,४७५/- रु कि. चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोना / १५६६ श्यामसुंदर अंकुश जाधवयांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खर्डा पोलीस स्टेशन गु. र. नं. ११/२०२६ गुंगीकारक औषधिद्रव्ये आणिमनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत. सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर व प्रविणचंद लोखंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर व खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!