सुदाम वराट यांना पुरस्कार म्हणजे कामाची पावती – प्रा. श्रीराम मुरूमकर आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सुदाम वराट यांचा विद्यालयात ग्रामस्थ, मित्रमंडळी व स्टाफच्या वतीने सन्मान
सुदाम वराट यांना पुरस्कार म्हणजे कामाची पावती – प्रा. श्रीराम मुरूमकर
आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सुदाम वराट यांचा विद्यालयात ग्रामस्थ, मित्रमंडळी व स्टाफच्या वतीने सन्मान
सुदाम वराट यांना संविधान महोत्सव समितीच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाला त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक प्रश्नांना वाचा फोडली, निर्भीड लिखाण केले त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाला हीच त्यांच्या कामाची पावती आहे. असे प्रतिपादन माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर यांनी व्यक्त केले.
श्री साकेश्वर विद्यालयातील शिक्षक सुदाम वराट यांना संविधान महोत्सव समितीच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला याबद्दल त्यांचा सत्कार श्रीराम मुरूमकर, प्रमोद मुरूमकर, श्यामराव घोडेस्वार, रोहित घोडेस्वार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच मुख्याध्यापक भरत लहाने यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रोहित घोडेस्वार यांच्या उपक्रमाची राज्य पातळीवर निवड झाल्याबद्दल राज्य पातळीसाठी शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर, प्रमोद मुरूमकर, श्यामराव घोडेस्वार, रोहित घोडेस्वार, मुख्याध्यापक भरत लहाने, सुदाम वराट, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, मुकुंद वराट, प्रसाद होशिंग, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक भरत लहाने म्हणाले की, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वाच्या सहकार्याने प्रयत्न करू व निश्चितच पुर्वीचे असणारे साकतचे हुशारी बाबतचे वैभव प्राप्त करू असे आश्वासन दिले.
सुदाम वराट हे गेल्या सतरा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. सुरूवातीलापाच वर्षे सकाळ वर्तमानपत्रात काम केले सध्याबारा वर्षापासून सामना वर्तमानपत्रात जामखेड तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत तसेच चार वर्षापासून जामखेड न्यूजचे संपादक म्हणून काम करत आहेत. पत्रकारितेत काम करताना अनेक सामाजिक, शैक्षणिक प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून सोडवत वंचित घटकांना न्याय मिळवून दिला. शालेय पोषण आहार योजना निकृष्ट व कालबाह्य धान्यादी मालाबाबबत बातमी प्रसिद्ध करत राज्यातील सर्व शाळांमध्ये उच्च प्रतिचा माल मिळू लागला तसेच पिंपळवाडी, कडभनवाडी शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सुरू करण्यात मोलाचा वाटा तसेच रस्ते, पुल, वीज प्रश्न मार्गी लावले. निकृष्ट रस्ता तसेच जलजीवन काम करणाऱ्या विरोधात बातम्या प्रसिद्ध करत काही ठेकेदारांवर कारवाई झाली तसेच काहींना काळ्या यादीत टाकण्यात आले. वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सुदाम वराट यांनी आपल्या पत्रकारितेचा वापर केला यांची दखल घेत संविधान महोत्सव समिती च्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन वराट तर आभार अर्जुन रासकर यांनी मानले.