Sunday, February 1, 2026
Home ताज्या बातम्या राज्याला मोठा धक्का! महाराष्ट्राचा दादा हरपला, विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू, विमान...

राज्याला मोठा धक्का! महाराष्ट्राचा दादा हरपला, विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू, विमान जळून खाक

0
13

जामखेड न्युज——

राज्याला मोठा धक्का!

महाराष्ट्राचा दादा हरपला, विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू, विमान जळून खाक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येत आहे. तर विमान जळून खाक झालं आहे.

आज सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.

ताज्या अपडेटनुसार, या विमान अपघातापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दादांन घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालं आहे.

बारामती दौऱ्यासाठी ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात दादांचं दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचाय समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या.

महानगर पालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता. हा अपघात नेमका कशामुळे झाला. तांत्रिक बाब काय, या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे.

अजित पवार हे मुंबईहून एका नियोजित कार्यक्रमासाठी बारामतीला येत होते. बारामती विमानतळावर विमान उतरवत असताना वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवर वेगाने आदळले. या दुर्घटनेत अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या अपघातात अजित पवार यांचे दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!