जामखेडमध्ये विश्वकर्मा वंशीय सुतार समाज संघटनेतर्फे श्री संत जळोजी मळोजी यांच्या पुण्यतिथी साजरी

0
190

जामखेड न्युज——-

जामखेडमध्ये विश्वकर्मा वंशीय सुतार समाज संघटनेतर्फे श्री संत जळोजी मळोजी यांच्या पुण्यतिथी साजरी

 

जामखेड येथे पौष वैद्य पंचमी दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी श्री विश्वकर्मा वंशीय सुतार समाज संघटनेतर्फे श्री संत जळोजी मळोजी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ७ ते ८ अभिषेक ८:३० ते १० मिरवणूक १० ते १२, ह भ प मधुकर महाराज केदार यांचा कीर्तनाचा कार्यक्रम व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी जामखेड नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रांजलताई चिंतामणी तसेच अमित शेठ चिंतामणी नगरसेवक पोपट नाना राळेभात मनोज काका कुलकर्णी माजी उपनगराध्यक्ष महेश शेठ निमोणकर तसेच नगरसेवक मोहन शेठ पवार, सौ नंदाताई होळकर,प्रवीण शेठ होळकर यांच्या हस्ते महा आरती करण्यात आली या कार्यक्रमासाठी तालुक्यातून सुतार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या कार्यक्रमासाठी श्री विठ्ठल भजनी मंडळाचे खूप सहकार्य झाले तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष आनंद राजगुरू उपाध्यक्ष संजय बनगे,उपाध्यक्ष गणेश गवळी, सचिव प्रल्हाद राजगुरू,संघटक गणेश सुतार प्रमुख मार्गदर्शक पंढरीनाथ राजगुरू, रंगनाथ राजगुरू,तसेच बाळासाहेब जिरेकर,अंकुश राजगुरू नारायण राजगुरू कुमार राजगुरू सर,संतोष क्षीरसागर, ज्ञानेश्वर क्षीरसागर, भगवान राजगुरू आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here