Wednesday, March 4, 2026
Home ताज्या बातम्या विठ्ठल पुलवळे यांनी गावाला कुटुंब समजून आदर्श काम केले – सिनेअभिनेते गिरीश...

विठ्ठल पुलवळे यांनी गावाला कुटुंब समजून आदर्श काम केले – सिनेअभिनेते गिरीश परदेशी विठ्ठल पुलवळे (कोतवाल यांचा सेवापुर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

0
356

जामखेड न्युज——–

विठ्ठल पुलवळे यांनी गावाला कुटुंब समजून आदर्श काम केले – सिनेअभिनेते गिरीश परदेशी

विठ्ठल पुलवळे (कोतवाल यांचा सेवापुर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

विठ्ठल पुलवळे कोतवाल यांच्या सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त एवढी मोठी गर्दी म्हणजे त्यांच्या कामाची पावती आहे त्यांनी गावावा आपले कुटुंब समजून आदर्श काम केले. आणि समाजात आदर्श निर्माण केला असे मत सिने अभिनेते गिरीश परदेशी यांनी व्यक्त केले.

साकत येथे साहित्यरत्न प्रतिष्ठान च्या वतीने विठ्ठल मारुती पुलवळे (कोतवाल) यांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य गौरव सोहळा रविवारी दि. ४ जानेवारी २०२६ रोजी साकत, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या सेवापूर्ती गौरव सोहळ्या निमित्त सायंकाळी ह.भ.प.विनोदाचार्य पांडुरंग महाराज उगले (परभणी) यांचे भव्य व दिव्य कीर्तन झाले. कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. कीर्तनानंतर उपस्थित भाविक मान्यवर व ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ह.भ.प. उत्तम महाराज वराट (साकत)यांचे शुभाशीर्वाद लाभले.

कार्यक्रमाचे आयोजन साहित्यरत्न प्रतिष्ठानचे मुख्य सचिव अमोल विठ्ठल पुलवळे यांनी केले होते. विठ्ठल मारुती पुलवळे यांनी तलाठ्यांच्या हाताखाली काम करत शासन व ग्रामस्थ यांचा चांगला समन्वय राखला.

डॉ. सतिश सुर्यवंशी जय मल्हार मालिकेतील कलाकार यांनी सांगितले की, अमोल पुलवळे सारखी निस्वार्थ प्रेम करणारी मुले खुप कमी असतात. अमोल ने आज समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. यावेळी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, संजय वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी उपसभापती कैलास वराट यांनी विठ्ठल पुलवळे यांच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

सिनेअभिनेते गिरीश परदेशी, डॉ. सतिश सुर्यवंशी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, संजय वराट, कृषी बाजार उत्पन्न समितीचे माजी उपसभापती कैलास वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, हरिभाऊ मुरूमकर, रोहित घोडेस्वार, मिलन घोडेस्वार, सदाशिव वराट, शिवचंद वराट, ग्रामपंचायत सदस्य सागर मुरूमकर, शहादेव वराट, कृषी अधिकारी सुरेश वराट, प्रमोद मुरुमकर, ऋषिकेश पाटील, उपसरपंच राजभाऊ वराट पाटोद्याचे गफ्फार पठाण, पाटोदा नगरपरिषदेचे सभापती किशोर आदागळे, पोलीस पाटील महादेव वराट श्री साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत लहाने, हनुमंत वराट, हरित सेवक राम मुरूमकर, त्रिंबक पुलवळे, झुंबर पुलवळे, सुनील पुलवळे, अमोल पुलवळे, कृष्णा पुलवळे यांच्या सह साकत पंचक्रोशीतील कोल्हेवाडी,कडभनवाडी व पिंपळवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!