आजीनाथ हजारे यांचे सामाजिक कार्य समाजाला दिशा देणारे – प्रा. मधुकर राळेभात जवळा येथे सभापती प्रा.राम शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

0
304

जामखेड न्युज——

आजीनाथ हजारे यांचे सामाजिक कार्य समाजाला दिशा देणारे – प्रा. मधुकर राळेभात

जवळा येथे सभापती प्रा.राम शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

संगत ठरवते जीवनाची दिशा, त्यासाठी संगत खूप महत्त्वाची आहे.तुमच्या जीवनाची दशा आणि दिशा ही तुमची संगतच ठरवत असते. ज्योती क्रांती मल्टीटेटचे अध्यक्ष आजिनाथ हजारे यांचे सामाजिक कार्य हे समाजाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी केले.

जामखेड तालुक्यातील जवळा येथे महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आजिनाथ हजारे मित्र मंडळाच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग बोलताना म्हणाले की,ज्योती क्रांती मल्टिटेटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देण्याचे खूप मोठे काम झाले आहे. अध्यक्ष आजिनाथ हजारे यांच्या विचारांचे एक जाळे तयार झाले आहे,

यावेळी मान्यवरांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उ‌द्घाटन करण्यात आले.दरम्यान,जामखेड नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रांजल अमित चिंतामणी यांच्यासह १५ नगरसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा चे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग,ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात,भाजपचे तालुकाध्यक्ष बापू ढवळे, शहरमंडल अध्यक्ष संजय काशिद,भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे,माजी सभापती दत्तात्रय वारे, सोमनाथ पाचारणे, सेवानिवृत्त आयुक्त राजेंद्र पवार, सखाराम भोरे, चंद्रकांत राळेभात, सरचिटणीस पांडुरंग उबाळे, माजी नगरसेवक अमित चिंतामणी,अमित जाधव ,डॉ. महादेव पवार, डॉ. दीपक वाळुंजकर, डॉ. सुधीर ढगे, सरपंच सुशील आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, राहुल पाटील, गौतम कोल्हे, विष्णू हजारे, मारुती रोडे, पोपट शिंदे, राजाराम सूळ, कैलास पाटील, मच्छिंद्र सूळ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हनुमंत (महाराज) निकम यांनी केले.

 

चौकट
शिबिरात १६७ रुग्णांची तपासणी

————————————-
जामखेडचे रामेश्वर हॉस्पिटल आणि आजिनाथ हजारे मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिर संपन्न झाले. यामध्ये १६७रुग्णांची तपासणी झाली. शुगर, बीपी, कंबरदुखी, जुन्या काळातील फ्रँक्चर असलेल्या रुग्णांची तपासणी करून, मोफत औषध उपचार करण्यात आले. डॉ. दादासाहेब सावंत व स्टाफने रुग्णांची तपासणी व करून औषधोपचार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here