माजी सरपंच कांतीलाल वराट यांच्या तर्फे साकत परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना पाणी बाँटलचे वाटप सभापती प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य सामाजिक उपक्रम
माजी सरपंच कांतीलाल वराट यांच्या तर्फे साकत परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना पाणी बाँटलचे वाटप
सभापती प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य सामाजिक उपक्रम
साकतचे माजी सरपंच व भाजपाचे युवा नेते सभापती प्रा राम शिंदे यांचे खंदे समर्थक कांतीलाल(चंद्रकांत) वराट यांनी सभापती प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साकेश्वर विद्यालय साकत, जिल्हा परिषद शाळा साकत, कोल्हेवाडी, पिंपळवाडी, कडभनवाडी, हनुमान वस्ती येथील विद्यार्थ्यांना पाणी बाँटलचे वाटप करण्यात आले.
आज सकाळी श्री साकेश्वर विद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करून सभापती प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कांतीलाल वराट यांच्या तर्फे पाणी बाँटलचे वाटप करण्यात आले यावेळी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, कांतीलाल वराट माजी सरपंच भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक भरत लहाने, सुदाम वराट, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, मुकुंद वराट, प्रसाद होशिंग, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदे, छाया वराट, कविता लहाने, अमोल वराट, बाळासाहेब वराट, शंकर वराट, केशव वराट, दत्ता वराट, सोमा वराट, हरी भोरे, रोहन मुरूमकर, उद्धव वराट, रौद्रशंभो युवा मंच आणि मा.कांतीलाल वाराट मित्र मंडळ तसेच मंगेश वराट, रितेश वराट, प्रणित वराट, दादासाहेब घोडेस्वार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कांतीलाल वराट हे युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखले जातात. नेहमी तरूणांच्या गराड्यात असतात. सरपंच पदाच्या काळात अनेक विकास कामे मार्गी लावलेली आहेत. मुख्यमंत्री पेयजल योजना मार्गी लावली. तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात विठ्ठल मंदिर क वर्ग तीर्थक्षेत्र आराखड्यात बसवले यामुळे मंदिर परिसराचा विकास झाला आता दरवर्षी निधी प्राप्त होत आहे.
त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसानिमित्त साकत गणात विविध ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी युवा कार्यकर्त्यांनी कांतीलाल वराट यांनी पंचायत समिती निवडणूक लढवावी अशी मागणी करण्यात आली.
सभापती प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना पाणी बाँटल मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला.
चौकट
सभापती प्रा राम शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते व हितचिंतक नातेवाईक यांना आवाहन केले होते की, वाढदिवसाला केक, हार, तुरे याऐवजी सामाजिक उपक्रम राबवावेत या आव्हानांना प्रतिसाद देत माजी सरपंच कांतीलाल वराट यांनी विद्यार्थ्यांना पाणी बाँटलचे वाटप केले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चौकट
यावेळी नवनियुक्त मुख्याध्यापक भरत लहाने यांचा कांतीलाल वराट मित्रमंडळाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.