विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गुऱ्हेवाडी व महारुली येथे सचिन (नाना) घुमरे मित्र परिवार कडून शालेय विद्यार्थ्यांना रायटिंग पॅडचे वाटप.

0
528

जामखेड न्युज——

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गुऱ्हेवाडी व महारुली येथे सचिन (नाना) घुमरे मित्र परिवार कडून शालेय विद्यार्थ्यांना रायटिंग पॅडचे वाटप.

1 जानेवारी रोजी विधानपरिषद सभापती राम शिंदे साहेब यांचा वाढदिवस जामखेड तालुक्यामध्ये विविध उपक्रमातून सादर करण्यात येतो कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन (नाना) घुमरे यांच्या वतीने प्रत्येक वर्षी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून व समाजातील गरजू लोकांना मदत करून सभापती साहेबांचा वाढदिवस साजरा केला जातो.

यावर्षी गुऱ्हेवाडी महारुली येथे सर्व शालेय विद्यार्थ्यांना सरपंच बाबासाहेब जाधव यांच्या हस्ते रायटिंग पॅड चे वाटप करून साजरा करण्यात आला.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन (नाना) घुमरे मित्र परिवाराच्या वतीने दिघोळ गणातील इतर गावात देखील शालेय विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड, स्कूल बॅग चे वाटप करून व समाजातील गरजू लोकांना मदत करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी गावातील उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब लोंढे, नाना जाधव, दादा जाधव, नवनाथ जाधव, कल्याण जाधव, अर्जुन कोरडे, गौतम नाना कोरडे, महाराज धोंडीबा पवार, विकास कोरडे, अशोक जाधव, अंकुश मुळे, शामराव सातपुते, शरद चव्हाण, आप्पा कोरडे, उद्धव लोंढे, केरु जाधव, संतोष कोरडे, अशोक अनपट , शिवनाथ अनपट, विशाल कोरडे, शाळेचे शिक्षक राऊत सर व माने सर, व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक शेतकरी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

चौकट
सभापती प्रा. राम शिंदे यांचा १ जानेवारी रोजी वाढदिवस असतो. यानिमित्ताने त्यांनी कार्यकर्ते, हितचिंतकांना आवाहन केले होते की, वाढदिवसानिमित्त केक, हारतुरे, ऐवजी सामाजिक उपक्रम राबवावेत या आवाहनाला प्रतिसाद देत सचिन (नाना) घुमरे यांनी विद्यार्थ्यांना फायदा होईल असे रायटिंग पॅडचे वाटप केले. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here