माजी प्राचार्य जी. एल. देशमुख यांचे अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने निधन
वाचनाचा प्रंचड व्यासंग असणारे माजी प्राचार्य जी. एल. देशमुख (वय 82)यांचे वृद्धापकाळ व अल्पशा आजाराने पुणे येथे आज सकाळी सहा वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी अकरा वाजता सोनिगरा टाऊनशिप केशवनगर चिंचवड येथून निघेल.
ल. ना. होशिंग येथे अनेक वर्षे शिक्षक, श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे मुख्याध्यापक तसेच ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड येथे प्राचार्य म्हणून सरांनी सेवा केली. तसेच शहरातील लोकमान्य वाचनालयाचे ते अनेक वर्षे सचिव होते. सेवानिवृत्त झाल्यावर पुणे येथे स्थायिक झाले होते.
आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी कळताच जामखेड परिसरात तसेच दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये शोककळा पसरली.
त्यांच्या मागे भाऊ अ. ल. देशमुख शिक्षण तज्ञ, राष्ट्रपती पारितोषिक विजेते, पत्नी, एक मुलगा( विवाहित) मुलगी (विवाहित) सुन नातवंडे असा परिवार आहे.