जामखेड सौताडा रस्त्याचे अर्धवट काम, कामातील धोकादायक गज यामुळे अनेक जण जखमी
नागरिक त्रस्त, ठेकेदार सुस्त
जामखेड शहरातील खर्डा चौक ते बीड रोडवरील समर्थ हॉस्पीटल पर्यंतचा अपुर्ण रस्ता यामुळे ट्रॅफिक जाम ची समस्या तसेच अपुर्ण रस्ता कामातील बाहेर निघलेले गज हे धोकादायक बनले आहेत. समर्थ हॉस्पीटल समोर एक साईट शंभर फुट सिमेंट रस्ता बनवला आहे याला पंधरा दिवस झाले पुढील काम ठप्प आहे तसेच रस्ता कामाच्या बाहेर निघलेले गज खुपच धोकादायक बनले आहेत. गजामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. ताबडतोब रस्ता काम पूर्ण व्हावे अशी मागणी होत आहे.
अकरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जामखेड तहसील कार्यालयात सबंधित विभागाचे अधिकारी ठेकेदार यांना बोलावत कामाबाबत आढावा घेत. तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकारी व ठेकेदार यांना देण्यात आल्या होत्या. जर रस्ता कामात कोणी अडथळा निर्माण करत असेल तर ठेकेदार यांनी पोलिस संरक्षण घेऊन अडथळा निर्माण करण्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या दहा दिवस झाले तरी कामच सरू झालेले नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम ची समस्या निर्माण होत आहे. यामुळे वाहनचालक व जामखेडचे नागरिक वैतागले आहेत. नेमका रस्ता का होत नाही याचे कोडे जामखेड करांना अद्याप उलगडत नाही.
अकरा दिवस झाले तरी रखडलेला रस्ता काम अद्याप सुरू झालेले नाही. यामुळे ट्रॅफिक जाम च्या समस्यांमुळे वाहनधारक व नागरिक हैराण झाले आहेत. एकतर बीड रस्ता रूंदी काही प्रमाणात कमी झाली आहे. अतिक्रमणे निघत नाहीत यामुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
गटाराच्या बाहेर नगरपरिषदेची जागा आहे पाणीपुरवठा पाईपलाईन व शहरातील सांडपाणी गटार व्यवस्था यासाठी पण गटार नालीवर अतिक्रमणे झालेली आहेत. नगरपरिषद कधी व केव्हा हटविणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
जिल्हाधिकारी दहा दिवसांपूर्वी आले तेव्हा तहसीलदार धनंजय बांगर , गटविकास अधिकारी शुभम जाधव, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी अजय साळवे, शशिकांत सुतार सार्वजनिक बांधकाम विभाग, रवींद्र घुले तालुका कृषी अधिकारी, दिलीप तिजोरे सहायक निबंधक जामखेड, महावितरणच्या चव्हाण सहा आदी अधिकारी उपस्थित होते.
अनेक महिन्यांपासून समर्थ हॉस्पीटल ते खर्डा चौक हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यासाठी ठेकेदार व अधिकारी यांची जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी झाडाझडती घेत हा रस्ता तत्काळ झाला पाहिजे अशा सूचना अधिकारी व ठेकेदार यांना देण्यात आल्या होत्या तरीही रस्ता काम सुरू होत नाही.
जिल्हाधिकारी यांनी रस्त्याबाबत कोण अडथळा निर्माण करत असेल तर त्यांना कायदेशीर कारवाई करा पण रस्त्याबाबत कोणताही निष्काळजी पणा चालणार नाही. त्यामुळे जामखेड सौताडा रस्ता बाबत जिल्हाधिकारी ॲक्शन मोड वर आल्याने जामखेड सौताडा रस्ता लवकर मार्गी लागणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला होता. पण दहा दिवस झाले तरी कामच सरू नाही यामुळे ट्रॅफिक जाम ची समस्या रोजचीच झाली आहे. बाहेर आलेल्या गजामुळे अनेकजण जखमी झाले आहेत.