जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला दणदणीत यश मिळालं आहे. भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी या प्रचंड मतांनी विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपाने १५ जागांवर विजय मिळवत स्पष्ट वर्चस्व सिद्ध केलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागा आणि बहुजन वंचित आघाडीला २ जागा, तर शिवसेना शिंदे गट १ जागा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना १ जागा अशा विरोधकांना एकूण ९ जागेवर समाधान मानावं लागलं आहे. या निकालाने नगराध्यक्ष व नगरसेवक या पदावर भरघोस मतांनी निवडून येऊन सौ प्रांजल अमित चिंतामणी या जामखेड करांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवून सभापती राम शिंदे यांनी प्रचारात घेतलेली आघाडी निकालात सुध्दा दाखवून दिली.
मी सर्व मतदारांचे आभार मानतो आणि जीवनात कधीही त्यांचे उपकार विसरणार नाही. सभापती प्रा राम शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे सर्व भावनिक झाले आणि वचन नाम्यानुसार काम करेल हा विश्वास जनतेस दिला.
उमेदवारांची निवड ते प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांची घेतलेली भेट मतदारांना आकर्षित करुन गेली असे दिसते. सभापती राम शिंदे यांनी घेतलेली एकमेव जाहीर सभा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेऊन जामखेडच्या विकासासाठी कटिबद्ध राहू असा वचननामा जाहीर केला… जामखेडच्या जनतेने विशेष कौल देत १५ जागांवर भाजपाला विजयी करीत विश्वास व्यक्त केला आहे.
या निवडणुकीने अनेकांना आपापली जागा दाखवून पुन्हा जनतेत जाऊन काम करावं लागेल असा गर्भित इशाराही दिल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणूक म्हटल्यावर शह- काटशहाचे राजकारण तर होणारच… त्याप्रमाणे वेगवेगळे आडाखे बांधून लढलेली निवडणूक चिरकाल स्मरणात राहील अशीच झाली.
प्रा राम शिंदे यांच्या वतीने माजी नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या पत्नी सौ प्रांजल अमित चिंतामणी यांना जनतेतून निवड होणाऱ्या प्रथम नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देऊन अमित चिंतामणी यांनी केलेल्या कार्यावर दाखवलेला विश्वास प्रचंड प्रमाणात सार्थ ठरला.प्रा राम शिंदे यांच्यावर प्रचंड विश्वास आणि पक्षनिष्ठा यांच्या जोरावर शिंदेंच्या मार्गदर्शनाने काम करणारा कार्यकर्ता.अमित चिंतामणी यांची प्रतिमाच मूळात अत्यंत कर्म प्रधान आणि जनतेसाठी काम करणारा तळमळीचा कार्यकर्ता अशीच आहे.
अगदी अजातशत्रू असून समोरची समस्या समजून घेऊन त्यावर योग्य तेवढंच बोलणारा, आणि समस्येतून मार्ग काढण्यासाठी धडपडणारा कार्यकर्ता हीच भावना ठेवून काम करण्याची वृत्ती. सामाजिक सलोख्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमित चिंतामणी. सर्व जाती-धर्मातील सर्वांशीच आपुलकीनं वागणं, समोर कोणत्या जातीचा- धर्माचा याचा विचार न करता तो गरजू आहे आणि मी त्याला मदत केली पाहिजे याच उदात्त भावनेनं काम, लोकांचाही तसाच प्रतिसाद मिळणं,मदतीसाठी पुढाकार, समोरच्यांच्या विचारांना किंमत देऊन कार्य करणारे.
श्री देवी नवरात्र उत्सवात दरवर्षी मोहटा देवी दर्शनासाठी महिला भाविक भक्तांना स्वखर्चाने घेऊन जातांना प्रत्येकाची काळजी घेऊन देवीचे दर्शन घडवून आणण्यासाठीचा वसा घेतलेला कार्यकर्ता. जवळपास ११ वर्षे सलग कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने महिलांसाठीचा ग्रुप दांडिया कार्यक्रम अत्यंत उत्साहाने घेऊन दांडियाच्या अंती सर्वाना सुरुची नाष्ट्याची परंपरा आजपावेतो चालू आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एका सेलिब्रिटींची उपस्थिती सर्वांचे मन मोहून घेते… महिला वर्ग या कार्यक्रमाची आवर्जून वाट पहात असतो हे जामखेडकर जाणून आहेत. प्रभाग चार चे नगरसेवक म्हणून काम करतांना एक आदर्श नगरसेवक कसा असावा याचा वस्तुपाठच घालून दिलेला दिसतो. प्रभागातील प्रत्येकाच्या घरापर्यंत सडक किंवा पेव्हिंग ब्लॉग ची रचना हे या प्रभागाचे वैशिष्ट्य. शासनाच्या सर्व सुविधा प्रभागात देण्यासाठी सतत धडपड करणारा कार्यकर्ता ही त्यांची ख्याती.. अशा उमेदवारास नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळताच जामखेड ची जनता जामखेडच्या विकासासाठी स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी, भूमिगत गटारी, स्वच्छ पाणी, चांगली सडक , वीज हे प्रत्येकास योग्य पध्दतीने मिळेल या आशेने अमित चिंतामणी, सौ प्रांजल चिंतामणी आणि सभापती राम शिंदे यांच्यावर खूप विश्वासाने भरघोस मतदान करून जामखेडचा विकास करण्याची संधी दिली आहे. नगर परिषदेतील २४ ही नगरसेवकांना बरोबर घेऊन अमित चिंतामणी जामखेडचा विकास निश्चितपणे करतील हा विश्वास जामखेड करांना वाटतो अशी चर्चा आहे. निवडणूक निकालाचं
चौकट
प्रांजल चिंतामणींचा दुहेरी गुलाल
जामखेड नगरपरिषद निवडणूकीत प्रांजल अमित चिंतामणी या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी ही उभ्या होत्या. सर्व विरोधकांनी नगर सेवक व नगराध्यक्ष पदासाठीही त्या निवडून येऊ नयेत या साठी कंबर कसली होती. मात्र आपल्या प्रभागात प्रामाणिक पणे केलेल्या विकास कामांची पावती देत जामखेडकर मतदारांनी भरघोस यशाचे माप देत दुहेरी गुलाल उधळून विरोधकांना चारी मुंड्या चित केले . अशी ही जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक घटना ठरली आहे. आणि आता शासनाने कायद्यात बदल करून एका व्यक्तीला नगराध्यक्ष व नगरसेवक या दुहेरी पदावर राहता येणार असा निर्णय दिला आहे. त्यामुळे प्रांजल चिंतामणी या नगरसेवक व नगराध्यक्ष पदी राहणार आहेत.
चौकट वंचितांनी काढले नगर परिषदेत डोके वर
या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वंचित बहुजन आघाडीने दोन नगरसेवक निवडून आणून नगर परिषदेत आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. या साठी वंचित बहुजन आघाडीचे ॲड अरुण जाधव यांनी काढलेले मोर्चे, न्याय हक्कासाठी केलेले आंदोलने, एल्गार आंदोलन, दंडवत आंदोलन, मदारींसाठीच्या वसाहतीसाठीचा लढा तसेच सातत्याने तळागाळातील लोकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत प्रभागातील मतदारांनी थेट नगर परिषदेत भरघोस मतांनी विजयी केले आहे. त्यांच्या सोबत संगीताताई भालेराव या ही विजयी झाल्या आहेत… यामुळे वंचित बहुजन आघाडीला मोठी ताकद मिळाली असून आत्तापर्यंत केलेल्या संघर्षाचा ॲड अरुण जाधव यांच्या सारख्या कार्यकर्त्याचा आंबेडकरी चळवळीचा विजय आहे.
चौकट
आ. रोहित पवार यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज – जामखेडकर
विश्लेषण करता प्रा राम शिंदे यांच्या मागे जनता का उभी राहिली याचे विरोधी पक्षाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं झालंय.. अशी जामखेडकरांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. विधानसभेच्या निकालानंतर धक्का देणारा हा निकाल आहे. विधानसभेचा निसटता विजयानंतर आमदार रोहित पवार विशिष्ट आखणी करुन निवडणुकीस सामोरे जातील असं जामखेड करांना वाटत होतं. परंतु कार्यकर्त्यांना बाजुस सारुन जनता माझ्याबरोबर असा अती आत्मविश्वास नडला असावा अशी जनतेत चर्चा आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी काय मोर्चे बांधणी होते, सर्व सामान्य मतदारांबरोबरच कार्यकर्त्यांना ही आमदार रोहीत पवार बरोबर घेऊन काम करणार की आपली एकाधिकारशाही राबवणार की यावेळीही प्रा राम शिंदे धोबीपछाड करणार , याचीच जामखेड करांना उत्सुकता लागून राहिली आहे. निवडणुकीत शह – काटशह होणारच आहे… हे सर्वच पक्ष करतात…. या वेळी ही हे दिसलं .. पण हा राजकारणाचा भाग आहे.