जामखेडमध्ये कत्तलीसाठी उपासपोटी बांधून ठेवलेल्या वीस जनावरांची जामखेड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका
जामखेड परिसरात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होते. अशा अनेक तक्रारी दाखल होत असतात. जामखेड, खर्डा, खडकत भागात कत्तलखाने आहेत जनावरांची तस्करी सुरू असते. आज गुप्त माहितीच्या आधारे जामखेड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने वीस गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करत साकत येथील गोशाळेत रवाना केले.
सदाफुले वस्तीवर कंपाऊंड मध्ये कत्तलीसाठी उपासपोटी बांधून ठेवलेल्या वीस जनावरांच्या जवळच कत्तल केलेल्या जनावरांचे हाड मांस शिंगे एक टन अंदाजे आढळून आले पोलीसांनी सर्व ताब्यात घेऊन पंचनामा केला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.
जामखेड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, जामखेड शहरातील सदाफुले वस्तीवर कत्तलीसाठी उपासपोटी काही जनावरे बांधून ठेवलेली आहेत. अशी माहिती मिळताच संयुक्त कारवाई करत वीस जनावरे व एक टन हाड, मांस, शिंगे आढळून आले.
जामखेड शहरातील सदाफुले वस्तीवर कत्तलीसाठी उपासपोटी बांधून ठेवलेली पंधरा जनावरे गोवंश जातीचे गाई, बैल मोठे जनावरे उपासपोटी बांधून ठेवलेली आहेत अशी माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा यांनी छापा टाकून गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेत पंचनामा केला. स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलीसांनी संयुक्त पणे कारवाई केली आहे. जनावरांना साकत येथील श्री साकेश्वर गोशाळेत रवाना केले.
तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकदशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, पोलीस नाईक जितेंद्र सरोदे, रवी वाघ, ज्ञानेश्वर बेल्हेकर यांनी कारवाई केली आहे.
या कारवाई मुळे जामखेड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वीस जनावरे श्री साकेश्वर गोशाळेत रवाना केली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.