जामखेड तालुकास्तरीय विज्ञान गणित आणि पर्यावरण प्रदर्शनाचा समारोप उत्साहात साजरा
पहा प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक
50 वेजामखेड तालुकास्तरीय विज्ञान गणित आणि पर्यावरण प्रदर्शनाचा समारोप खेमानंद इंग्लिश स्कूल जामखेड या ठिकाणी उत्साही वातावरणात पार पडला. यामध्ये तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.श्री.शुभम जाधव तर प्रमुख पाहुणे अहिल्यानगर च्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या गायकवाड मॅडम व नवनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रांजल चिंतामणी या होत्या. गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी शिक्षकांनी पूर्णपणे योगदान देणे आवश्यक आहे असे सांगितले,
गटविकास अधिकारी शुभम जाधव म्हणाले की, प्रत्येक शनिवारी विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव होण्या संबंधी उपक्रम पंचायत समिती मार्फत राबवणार असल्याचे सांगितले.
समारोप प्रसंगी गटशिक्षणाधिकारी मा.श्री.प्रदीप चव्हाण,विस्तार अधिकारी श्री कवळे साहेब ,आंधळे साहेब,जिल्हा विज्ञान संघटनेचे अध्यक्ष मा.बद्रीनाथ शिंदे , केंद्र प्रमुख तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
प्रदर्शनामध्ये विज्ञान विषयाचा निकाल विज्ञान संघटनेचे अध्यक्ष श्री बाजीराव गर्जे यांनी तर गणित विषयाचा निकाल गणित संघटनेचे अध्यक्ष श्री.भाऊसाहेब इथापे यांनी जाहीर केला.
विज्ञान गणित संघटनेमार्फत दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. विज्ञान विषयांमध्ये आदर्श शिक्षक म्हणून श्री.गणेश भाऊराव पवार यांना तर गणित विषयांमध्ये आदर्श शिक्षक म्हणून श्री.संतोष रामा ससाने आणि श्री.बाळासाहेब मनोहर रोडे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.कोपनर सर यांनी केले तर आभार श्री.ढाळे सर यांनी मानले.
खेमानंद इंग्लिश स्कुल जामखेड येथे संपन्न झालेल्यातालुका विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थी व शिक्षक पुढीलप्रमाणे
पहिली ते पाचवी विज्ञानप्रथम – अद्विक संदीप कचरे, द्वितीय- ओवी अमोल शेंदुरकर, तृतीय यश बिभीषण चव्हाण, उत्तेजनार्थ आदिब फारूक शेख, उत्तेजनाथ काव्या केशव डोके
इ. ६ वी ते इ.८ वी विज्ञान प्रथम -स्मिता भाऊसाहेब भोगील, द्वितीय श्रावणी शरद गंभिरे, तृतीयप्रज्ञा विवेक कुलकर्णी, उत्तेजनार्थ श्रेया रवींद्र निगुडे
इ. ९ वी ते इ. १२ वी विज्ञान प्रथम भाऊसाहेब संभाजी जगताप, द्वितीय सृष्टी वैजिनाथ घुमरे, तृतीय वैष्णवी मुन्ना मौर्या, उत्तेजनार्थ तृप्ती दादा भोसले
इ.१ ली ते इ. ५ वी गणित प्रथम शाश्वती राहुल निमकर, द्वितीय ऋग्वेद पाराजी टेमकर, तृतीय प्रतिक्षा हनुमंत कोळेकर, उत्तेजनार्थ तन्वी रामदास टेकाळे
इ. ६ वी ते इ. ८ वी गणित प्रथम शौर्या कांतीलाल जगदाळे, द्वितीय आर्या बाळासाहेब औटे, तृतीय मिहीर नितीन राऊत, उत्तेजनार्थ संजना शंकर मुंढे
इ. ९ वी ते इ. १२ वी गणित प्रथम वेदांत अभिजित निंबाळकर, द्वितीय पायल मच्छिंद्र वायफळकर तृतीय प्रीती सोमनाथ बिरंगळ उत्तेजनार्थ अनुष्का तान्हाजी गर्जे
प्राथमिक शिक्षक गट शैक्षणिक उपकरण निर्मितीप्रथम गर्जे श्रीमती वृषाली भागवत जायभाय, द्वितीय श्री सचिन सुभाष कदम, तृतीय श्री बाळासाहेब अंबादास औटे
माध्यमिक शिक्षक गट शैक्षणिक उपकरण निर्मितीप्रथम श्री घोडेस्वार रोहितकुमार शिवाजी द्वितीयश्री बोराटे सुभाष नामदेव, तृतीय श्री पवार गणेश भाऊराव
प्रयोगशाळा परिचर शैक्षणिक उपकरण निर्मिती प्रथम श्री मारुती बाबा जगताप अशा प्रकारे क्रमांक पटकावले