जामखेड नगरपरिषद निवडणूक निकालात भाजपाच सरस पंधरा नगरसेवक व नगराध्यक्ष पदावर विजय संपादन

0
4844

जामखेड न्युज——

जामखेड नगरपरिषद निवडणूक निकालात भाजपाच सरस

पंधरा नगरसेवक व नगराध्यक्ष पदावर विजय संपादन

जामखेड नगरपरिषद निवडणूकीत सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. यात भाजपाने गड राखला आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी साडेतीन हजार मतांपेक्षा जास्त मतांनी विजय संपादन केला आहे. तर पंधरा नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाच जागेवर विजयी तर वंचित बहुजन आघाडी दोन जागा शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष एक जागा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष एक अशा प्रकारे विजयी उमेदवार आहेत.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे आहेत

नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी साडेतीन हजार मतांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपाच्या प्रांजल अमित चिंतामणी यांना 9754 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संध्या शहाजी राळेभात 6072 चिंतामणी 3682 मतांनी विजयी

तर नगरसेवक पदासाठी पुढील उमेदवार विजयी आहेत.

प्रभाग एक-अ) सुमन शेळके ( भाजपा)
ब) श्रीराम डोके (भाजपा)

प्रभाग दोन- अ) अँड प्रविण सानप (भाजपा)
ब) प्रिती प्रशांत राळेभात ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

प्रभाग तीन – अ) पोपट राळेभात (भाजपा)
ब) सिमा रवींद्र कुलकर्णी (भाजपा)

चार- अ) विकी घायतडक (भाजपा)
ब) प्रांजल अमित चिंतामणी (भाजपा)

प्रभाग पाच अ) हर्षद काळे (भाजपा)

ब) वर्षा कैलास माने (शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष)

प्रभाग सहा- अ) डॉ. अँड.अरूण जाधव (वंचित बहुजन आघाडी)
ब) संगिता भालेराव (वंचित बहुजन आघाडी)

प्रभाग सात – अ) नंदा प्रविण होळकर (भाजपा)
ब) मोहन पवार (भाजपा)

प्रभाग आठ- अ) हिना सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
ब) राजू गोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

प्रभाग नऊ – अ) वैशाली अर्जुन म्हेत्रे (भाजपा)
ब) तात्याराम पोकळे (भाजपा)

प्रभाग दहा – अ) मेहरुन्निसा कुरेशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
ब) वशिम सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

प्रभाग आकरा – अ) संजय काशिद (भाजपा)
ब) आशाबाई टकले (भाजपा)

प्रभाग बारा – अ) महेश निमोणकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष)

ब) जया संतोष गव्हाळे (भाजपा)

चौकट
वंचित बहुजन आघाडीने आपले खाते उघडत दोन जागी विजय संपादन केला आहे. प्रभाग सहा- अ) डॉ. अँड.अरूण जाधव (वंचित बहुजन आघाडी)
ब) संगिता भालेराव (वंचित बहुजन आघाडी) विजय संपादन केला आहे.

चौकट

शिवसेना उबाठा गटाने जोरदार लढत दिली पण शेवटी 32 मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here