जामखेड महाविद्यालयाच्या पै.पवन गाडे ची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0
366

जामखेड न्युज——

जामखेड महाविद्यालयाच्या पै.पवन गाडे ची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत मु. स. काकडे कॉलेज सोमेश्वर नगर बारामती येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाचा पै पवन मारुती गाडे यांने 86kg या वजन गटात सुवर्ण पदक मिळविले होते.

5 जानेवारी ते 9 जानेवारी 2026 रोजी चंदीगड विदयापीठ मोहाली पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ (All India Inter University ) या राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळणार आहे.

जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील खेळाडूंची निवड झाल्याबद्दल पूर्ण तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संस्थेचे अध्यक्ष श्री उद्धव बापू देशमुख,उपाध्यक्ष श्री दिलीपशेठ गुगळे,सचिव श्री अरुणशेठ चिंतामणी, खजिनदार श्री शरद काका देशमुख,मा शशिकांत देशमुख,मा. राजेशजी मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉ.सुनिल जी. पुराणे, उपप्राचार्य सुनिल.वाय. नरके, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.आण्णा मोहिते, व सर्व संचालक मंडळ आणि प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

चौकट

या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये
मल्लखांब या स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाची खेळाडू स्नेहल दत्तात्रय भोसले (S.Y. Bsc) हिने स्पर्धेत पुणे विद्यापीठ संघाचे नेतृत्व करताना उत्कृष्ट कामगिरी करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघास सुवर्ण पदक मिळवून दिले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here