Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या खेळात सातत्य असल्यास यश नक्की मिळते – संजय काशिद जामखेडच्या दहा...

खेळात सातत्य असल्यास यश नक्की मिळते – संजय काशिद जामखेडच्या दहा खेळाडूंची राष्ट्रीय कलारिप्पायडू स्पर्धेसाठी निवड

0
378

जामखेड न्युज——

खेळात सातत्य असल्यास यश नक्की मिळते – संजय काशिद

जामखेडच्या दहा खेळाडूंची राष्ट्रीय कलारिप्पायडू स्पर्धेसाठी निवड

 

कोणत्याही खेळात यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी व सातत्य हवे आहे. जामखेड च्या खेळाडूंचे खेळात सातत्य आहे यामुळेच दहा खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली आहे. असे मत भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी सांगितले व सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

महाबळेश्वर पाचगणी येथे राज्यस्तरीय कलारिप्पायडू स्पर्धेमधून दहा खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली याबद्दल लोकमान्य शाळेत खेळाडूंचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुदाम वराट, महेश अवचरे, परशुराम राऊत, शाम पंडित, दिक्षा पंडित यांच्या सह सर्व खेळाडू अनेक मान्यवर उपस्थित होते. 

राज्य कलारिप्पायडू स्पर्धेत अहिल्यानगर संघाने चार स्वर्ण दोन रोप्य चार कास्य अशी दहा पथकाची लयलुट केली. यातील विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या जामखेडच्या रोहित थोरात व विशाल धोत्रे , मयूर शिरगिरे , मोहिनी शिरगिरे, सत्यजित राऊत, रोहित माने, श्रेयस वराट, पृथ्वीराज पंडित, खुशी बांदल , राजनंदिनी गोरे यांची केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय कलारिप्पायडू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पाचगणी महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय कलारीपायट्टू अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धेमध्ये अहिल्यानगर जिल्हा संघाने चार सुवर्ण दोन रोप्य चार कास्य अशी दहा पदके पटकावली. 

या स्पर्धेमधून सुवर्णपदक विजेते रोहित थोरात व विशाल धोत्रे.मयूर शिरगिरे. मोहिनी शिरगिरे रोप्यपदक विजेते सत्यजित राऊत व रोहित माने कास्यपदक विजेते श्रेयस वराट व पृथ्वीराज पंडित खुशी बांदल. राजनंदनी गोरे या खेळाडूंची केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय कलारिप्पायडू स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना शाम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

या सर्व खेळाडूंचे मराठी कलारिप्पायडू संघटनेचे सचिव निलेश वाळिंबे सर, कृष्णा वनवे, सोहेल शेख, संदेश गोरे, योगेश वाघमोडे, संदीप जायभाय, कोमल डोकडे, दीक्षा पंडित यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!