देशासाठी सुवर्णपदक मिळवणाऱ्या जामखेडच्या पैलवानाचा मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने सत्कार

0
883

जामखेड न्युज——

देशासाठी सुवर्णपदक मिळवणाऱ्या जामखेडच्या पैलवानाचा मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने सत्कार

व्हिएतनाम देशात झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत म्हणजेच 48 देशामध्ये शिऊर गावचा जामखेड तालुक्याचा अहिल्यानगर जिल्ह्याचा महाराष्ट्र राज्याचा व भारत देशाचा पैलवान सुजय नागनाथ तनपुरे याने भारतासाठी सुवर्णपदक मिळवले होते. ही स्पर्धा जून २०२५ मध्ये झाली होती.

कुस्ती स्पर्धेत मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल येथील पैलवान सुजय तनपुरे याने आशियाई चॅम्पियनशिप ( Asian Championship )उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर देशासाठी सुवर्णपदक पटकावले होते.

सर्व क्षेत्रातून पै.सुजयवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. आज पुणे येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी पैलवान सुजयचा सत्कार करत अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

या कौतुकास्पद कामगिरीनं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. सुजयचा आम्हा सर्वांनाच सार्थ अभिमान असून त्यानं दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि घेतलेली मेहनत ही नवोदित खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे…!

यावेळी आमचे स्नेही मित्र श्री पांडुरंग आवारे साहेब उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अक्षय भाऊ शिंदे मंत्रालयीन स्वीय सहाय्यक श्री सचिन जी काकडे पैलवान साहिल पाटील पैलवान अक्षय धस उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here