जामखेड महाविद्यालयातील खेळाडू स्नेहल भोसलेने खेलो इंडिया स्पर्धेत पुणे विद्यापीठास मिळवून दिले सुवर्णपदक
एलएनसीटी विद्यापीठ भोपाळ येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ All India Inter University (राष्ट्रीय) मल्लखांब स्पर्धेत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाला रौप्यपदक व पिरॅमिड प्रकारात कास्यपदक मिळवून देण्यास हातभार लावणारी जामखेड महाविद्यालयाची खेळाडूं कु.स्नेहल दत्तात्रय भोसले हिची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली होती.
जयपूर राजस्थान येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मल्लखांब या स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाची खेळाडूं स्नेहल दत्तात्रय भोसले (S.Y. Bsc) हिने स्पर्धेत पुणे विद्यापीठ संघाचे नेतृत्व करताना उत्कृष्ट कामगिरी करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघास सुवर्ण पदक मिळवून दिले.
याबद्दल पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. सुरेश गोसावी सर, प्र. कुलगुरू मा. डॉ. पराग काळकर सर, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे क्रीडा संचालक मा. डॉ. सुदाम शेळके,
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव बापू देशमुख, उपाध्यक्ष दिलीपशेठ गुगळे, सचिव अरुणशेठ चिंतामणी, खजिनदार शरदकाका देशमुख, शशिकांत देशमुख, राजेशजी मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल जी. पुराणे, उपप्राचार्य डॉ. सुनिल वाय. नरके सह
शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.आण्णा मोहिते, बबलु टेकाळे, अमोल निमोणकर सर्व संचालक मंडळ आणि प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्नेहल चे अभिनंदन केले आहे.