जामखेड कलाकेंद्रातील नृत्यांगनेची लाँजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या हत्या की आत्महत्या नागरिकांमध्ये प्रश्न

0
54

जामखेड न्युज——-

जामखेड कलाकेंद्रातील नृत्यांगनेची लाँजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

हत्या की आत्महत्या नागरिकांमध्ये प्रश्न

जामखेड येथील कलाकेंद्रात नृत्यांगनेचे काम करणारी नृत्यांगनेने जामखेड खर्डा रोडवरील एका लाँजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकी ही हत्या की आत्महत्या असा प्रश्न विचारला जात आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

जामखेड शहरातील तपनेश्वर भागातील नृत्यांगना दिपाली गोकुळ पाटील (वय 35) या महिलेनं गुरुवारी सकाळी खर्डा रोडवरील हॉटेल “साई लॉज ” च्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दिपाली ही मूळ कल्याण जिल्ह्यातील असून सध्या जामखेड येथील एका कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करत होती. ती आपल्या मैत्रिणीसोबत तपनेश्वर भागातील भाड्याच्या रुममध्ये राहत होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिपालीने सकाळी बाजारात जाते म्हणून सांगितले आणि बाहेर पडली. मात्र दुपारी बराच वेळ झाल्यानंतर ति परत आली नाही. तिच्या मैत्रिणींनी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण दिपालीचा फोन बंद असल्याने संपर्क साधता आला नाही. त्यामुळे मैत्रिणींनी दिपाली ज्या रिक्षाने गेली होती त्या रिक्षावाल्याला विचारले असता त्याने सांगितले की, दिपालीला खर्डा रोडवरील “साई लॉज” या हॉटेलात सोडले आहे.

मैत्रीण सायंकाळी साडेपाच च्या दरम्यान खर्डा रोडवरील त्या हॉटेल मधील लॉजकडे गेली असता, त्यांच्या लक्षात आले की रुमच्या आतून लॉक केलेले आहे. त्यांनी वेटरची मदत घेऊन दुसऱ्या चावीने रुमचा दरवाजा उघडला असता, दिपाली गोकुळ पाटील छताच्या पंख्याला गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळली.

घटनेनंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. जामखेड पोलीस स्टेशनकडून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीसांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन शवविच्छेदना साठी मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात हलविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केला आहे. दिपाली ही नृत्यांगना असून तिच्या आत्महत्येचे नेमक कारण अद्याप समजलेले नाही. तिची मैत्रिणी हर्षदा कामठे हिच्या तक्रारीनुसार पोलीसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.

चौकट
हत्या की आत्महत्या

जामखेड परिसरात अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यातच मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय, अवैध दारू विक्री, अवैध लॉजिंग, मावा, गुटखा विक्री हे राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे अशा घटना वारंवार घडतात. पोलिसांनी ताबडतोब अवैध धंदे बंद करून हि हत्या की आत्महत्या याचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here