आदर्श जामखेड नगरपरिषदेचे विकासाचे व्हिजन तयार करत शिवसेनेचा जाहिरनामा (वचननामा) प्रसिद्ध
पहा काय आहे वचननाम्यात
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने विकासाच्या व सामाजिक कामाच्या बळावर प्रचारात जोरदार मुसंडी मारलेली दिसून येत आहे. यातच आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेने आदर्श जामखेड नगरपरिषदेचे विकासाचे व्हिजन तयार करत शिवसेनेचा जाहिरनामा (वचननामा) प्रसिद्ध केला आहे. सत्ता आल्यास आंमलबजावणी केली जाईल असे शिवसेना नेते आकाश बाफना यांनी सांगितले.
आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेने आपला जाहिरनामा (वचननामा) प्रसिद्ध केला यावेळी पॅनल प्रमुख आकाश बाफना, कर्जत तालुकाध्यक्ष बापुसाहेब नेटके, जामखेड तालुकाध्यक्ष प्रा. कैलास माने, अनिल शिंदे, जिल्हा उपप्रमुख संतोष वाळुंजकर, कैलास जाधव, तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे, बब्रुवान वाळुंजकर, प्रविण बोलभट, शिवाजी विटकर, शामिर सय्यद, मोहन देवकाते, जयओम टेकाळे, विकास बाफना यांच्या सह अनेक शिवसैनिक हजर होते.
यावेळी वचननामा प्रसिद्ध करताना आकाश बाफना यांनी पुढील मुद्द्यावर फोकस केला. संपूर्ण प्रभागात दैनंदिन स्वच्छता, कचरा संकलणाची प्रभावी यंत्रणा, नियमित व मुबलक पाणी, महिलांसाठी सांस्कृतिक केंद्र, सुशोभीकरण, मुलांसाठी बागबगीचे खेळण्या, ज्येष्ठांसाठी जाँगिंग ट्रँक, विरंगुळा मैदाने, युवा वर्गासाठी ओपन जीम, दर्जेदार रस्ते निर्मिती, नागरिकांच्या सूचना तक्रारींच्या निपटाऱ्यांसाठी यंत्रणा, प्रभागातील विकास कामांचा लेखाजोखा, नियमित संपर्कातून विकास कामांचा आराखडा, सांडपाणी व्यवस्थापन आराखडा यासाठी पहिले सहा महिने तात्काळ सुधारणा, दुसरे सहा महिने बदलाची नवी सुरूवात, दुसरे वर्ष विकासाचा वेग, तिसरे वर्ष नव्या जामखेड ची निर्मिती, चौथे वर्ष भव्य पायाभूत उभारणी, पाचवे वर्ष एक आदर्श आधुनिक आणि आत्मनिर्भर जामखेड अशा प्रकारे वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना आकाश बाफना यांनी सांगितले की, अनेक पक्ष जाहिरनामा प्रसिद्ध करतात पण ऐंशी टक्के कामे पुर्ण करत नाहीत. आम्ही सर्व पुर्ण करत आदर्श जामखेड बनविणारच. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली एकदा शिवसेनेला संधी द्या आणि बघा काय बदल होत आहे.
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने म्हणाले की, आमच्या सर्व उमेदवारांना निवडणूक द्या आम्ही नक्कीच विकास घडवून आणू.
कर्जत तालुक्यात अनेकांना धुळ चारत राजटारणात यशस्वी पणे बापुसाहेब नेटके यांनी प्रवास केला आहे. आम्ही जामखेड निवडणुकीसाठी ते प्रभारी आहेत यामुळे ते जादुची कांडी फिरवून जामखेड नगरपरिषदेत शिवसेनेला विजयी रथात बसविणार का असा प्रश्न आहे.
चोकट जामखेड चांगली बाजारपेठ आहे दोन दिग्गज नेते आहेत पण अनेक समस्या ग्रस्त जामखेड आहे याचा कायापालट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच करणार आहे. शिवसेनेचे उमेदवार विकासाभिमुख आहेत नक्कीचपाच वर्षांत विकास घडवून येणार.