ब्रेकिंग न्यूज—- जामखेड नगरपरिषद दोन ब व चार ब प्रभागातील मंगळवारी होणारी निवडणूक स्थगित

0
3943

ब्रेकिंग न्यूज—-
जामखेड नगरपरिषद दोन ब व चार ब प्रभागातील मंगळवारी होणारी निवडणूक स्थगित

 

जामखेड नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्यात असताना नवीन ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवार दि. २ रोजी होणारी निवडणूक प्रभाग दोन ब व प्रभाग चार ब स्थगित करण्यात आली आहे. २० डिसेंबर रोजी निवडणूक होईल असे आदेशात म्हटले आहे.

न्यायालयात अपील दाखल झालेल्या नगरपरिषद निवडणूक सुधारित कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना छाननी दिवशी माजी नगराध्यक्षा अर्चना सोमनाथ राळेभात व भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी यांच्या सासुबाई अंजली अरूण चिंतामणी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून त्यांची सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी झाली होती. अर्ज निकाली काढले होते काल न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीं साठी राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भक्र.५ दिनांक ०४/११/२०२५ रोजी नुसार निवडणूक कार्यक्रम देण्यात आला होता. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णया विरोधात व्यथित उमेदवारास जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्याची निवडणूक नियमात तरतूद आहे व त्यानुसार व्यथित उमेदवाराकडून अपिल दाखल केले होते.

राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्र.रानिआ-२०२५/सुनिका/नप/प्र.क्र.१४/का.६, दि.२९/११/२०२५ सोबतचे सह न्यायालयीन अपील दाखल झालेल्या तसेच उपरोक्त दि.२९/११/२०२५ च्या पत्रातील परिच्छेद-३मधील नमूद ४ बाबींमुळे बाधित झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम-२०२५.

जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारीकरण्याची तारीख ०४/१२/२०२५

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक
१०/१२/२०२५ दुपारी ०३.०० वाजेपर्यंत

आवश्यकते प्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा |तसेच अंतिमरित्या निवडणूक
११/१२/२०२५

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक २०/१२/२०२५ रोजी
सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ५.३०

मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक
२१/१२/२०२५ सकाळी १०.००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here