Friday, March 13, 2026
Home शैक्षणिक बातम्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी जामखेड महाविद्यालयाच्या स्नेहल भोसलेची निवड जामखेडकरांसाठी अभिमानाची बाब

खेलो इंडिया स्पर्धेसाठी जामखेड महाविद्यालयाच्या स्नेहल भोसलेची निवड जामखेडकरांसाठी अभिमानाची बाब

0
423

जामखेड न्युज—–

खेलो इंडिया स्पर्धेसाठी जामखेड महाविद्यालयाच्या स्नेहल भोसलेची निवड

जामखेडकरांसाठी अभिमानाची बाब

शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात सतत प्रगतीचा आलेख वाढवत असलेल्या जामखेड महाविद्यालयाने पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी केली आहे. नुकत्याच चेन्नई येथे पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ (राष्ट्रीय) स्तरावरील स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्या संघातून जामखेड महाविद्यालयाच्या कु. स्नेहल भोसले हिची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ही स्पर्धा पूर्णिमा विद्यापीठ आणि राजस्थान विद्यापीठ, जयपूर येथे 2 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे. स्नेहल भोसले हिने आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या जोरावर ही निवड मिळवून जामखेड महाविद्यालयाचं, तसेच जामखेड तालुक्याचं नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केलं आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. उद्धव बापू देशमुख, उपाध्यक्ष श्री. दिलीपशेठ गुगळे, सचिव श्री. अरुणशेठ चिंतामणी, खजिनदार श्री. शरदकाका देशमुख, तसेच मा. शशिकांत देशमुख, मा. राजेशजी मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल जी. पुराणे, उपप्राचार्य डॉ. सुनिल वाय. नरके, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. आण्णा मोहिते, तसेच बबलु टेकाळे, अमोल निमोणकर, सर्व संचालक मंडळ, प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्नेहलचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

प्राचार्य डॉ. पुराणे यांनी सांगितले की, “स्नेहल भोसले ही आमच्या महाविद्यालयाची कर्तृत्ववान व मेहनती विद्यार्थिनी असून तिने सातत्य, शिस्त आणि निष्ठेच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तिच्या कामगिरीमुळे आमच्या विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा मिळेल.”

शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. आण्णा मोहिते यांनीही स्नेहलचे कौतुक करताना म्हटले की, “खेळाडू म्हणून स्नेहल नेहमीच संघभावना आणि कठोर परिश्रमाचे उदाहरण ठरली आहे. तिच्या निवडीमुळे जामखेड महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीला नवी दिशा मिळेल.”

महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, पालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी स्नेहलचे अभिनंदन करत तिच्या पुढील खेळो इंडिया स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे जामखेड तालुक्याचा राष्ट्रीय क्रीडा मंचावर पुन्हा एकदा गौरव झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!