महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का नाही?; गडकरींनी दिलं उत्तर; म्हणाले….

0
202
जामखेड न्युज – – – 
महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे असं स्पष्ट मत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं. दरम्यान यावेळी त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या विकासासंबंधी आपलं व्हिजन मांडलं.
गेल्या ७५ वर्षात महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान झाला नाही असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “महाराष्ट्राचा प्रधानमंत्री झाला पाहिजे, असं मला अजिबात एक टक्काही वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती प्रधानमंत्री झाला पाहिजे. मग त्याची जात, धर्म, पंत आणि राज्य कोणतंही असो. त्यामुळे मराठी माणूसच झाला पाहिजे किंवा महाराष्ट्रातलाच झाला पाहिजे, असं काही मला मान्य नाही. उद्या जर एखादा मराठी माणूस त्या पात्रतेचा असेल तर तो प्रधानमंत्री होईल. त्याला ती संधी मिळेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here