दिघोळ परिसरात पुराच्या पाण्यात वाहून आलेले अनोळखी प्रेत सापडले, एकच खळबळ
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत दिघोळ ग्रामपंचायत हद्दीतील माळेवाडी येथील वैजनाथ भगवान रंधवे यांच्या शेतात सोमवार दि. १३ रोजी दुपारी १२ च्या आसपास वांजरा नदीच्या काठी एक स्त्री जातीचे प्रेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दिघोळ चे पोलीस पाटील राजेंद्र छगन गिते वय ४५ यांनी याबाबत खर्डा पोलीस स्टेशनला खबर दिली यानुसार खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, मयत अनोळखी इसमाचे वर्णन एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत वय अंदाजे ६० ते ७० वर्ष ( नाव गाव माहित (नाही) हकिगत वरील तारखेस वेळी व ठिकाणी वैजिनाथ भगवान रंधवे यांचे शेतामध्ये वांजरा नदीचे काठी पुराच्या पाण्यामध्ये वाहुन आलेले एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत( नाव गाव माहीत नाही) वय अंदाजे ६० ते ७० वर्षे, आढळून आले आहे यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस पाटील राजेंद्र गिते यांच्या खबरी वरुन आकस्मात मृत्यु दाखल केला आहे.तरी सदर अनोळखी स्त्री जातीचे प्रेताबाबत अगर नातेवाईकां बाबत आप आपले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शोध घेवुन तसेच सदर अनोळखी स्त्री जातीचे प्रेताबाबत आपले पोलीस स्टेशनाला मिसींग अगर तक्रार दाखल असल्यास इकडील पोलीस स्टेशनला कळविणेस खर्डा पोलीसांनी विनंती आहे.
परिसरात अशा प्रकारे स्त्री जातीचे अनोळखी प्रेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वरील घटनेचा तपास खर्डा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एस एस जायभाय करत आहेत.