जामखेड तालुक्यातील नान्नज येथे रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुबिंयावर झालेल्या भ्याड हल्ला त्याच्या निषेधार्थ सर्व रिपब्लिकन, आंबेडकरवादी पक्ष व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशनवर एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी केले आहे.
रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांचे कुटुंबावर दि. २४/०८/२०२५ रोजी मध्यरात्री झालेल्या जीवघेणा भ्याड हल्ल्याचे निषेधार्थ दि. १२/१०/२०२५ रोजी जामखेड येथे एल्गार मोर्चा सकाळी ठिक ११.०० वाजता रिपब्लिकन व आंबेडकरी पक्ष संघटनाच्या वतीने संविधान चौक ते पोलीस स्टेशन, जामखेड एल्गार मोर्चा आयोजित केलेला आहे.
खालील प्रमाणे मागण्या आहेत
१. गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करावी
२. गुन्ह्यातील आरोपींवर संघटीत गुन्हेगारी खाली (मोक्का अंतर्गत) गुन्हा दाखल करावा
३. साळवे कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे ४. साळवे कुटुंबावर झालेला हल्ला हा पूर्व नियोजित कट असल्याने कलम १२० ब लावावे व मुख्यसूत्रधारास अटक करावे. ५. केस फास्टट्रँक वर चालवावी व विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करून सहा महिन्याच्या आत निकाल द्यावा
निवेदन जामखेड पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे या निवेदनावर सुनिल साळवे, विकास मासाळ, विशाल गव्हाळे, आतिष पारवे, सतिश साळवे, शिवाजी साळवे, संतोष गव्हाळे, युवराज गायकवाड, बापू जावळे, अनिल जावळे यांच्या सह अनेकांच्या सह्या आहेत.