ल.ना.होशिंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे मैदानी स्पर्धेत यश संपादन
दि. 7 व 8 आक्टोबर 2025 रोजी प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरा ता.राहाता येथे संपन्न झालेल्या जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत आपल्या ल.ना.होशिंग मा.व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या शालेय विभागीय ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
1.सिध्दी रासकर = 19 वर्षे वयोगटात थाळी फेक मध्ये प्रथम= गोळा फेक मध्ये प्रथम=
2.पायल गवळी = 17 वर्षे वयोगटात गोळा फेक मध्ये प्रथम= थाळी फेक मध्ये प्रथम=
3.नेत्रा गवळी……….. 14 वर्षे वयोगटात थाळी फेक मध्ये प्रथम =
4.अमीत जाधव…….. 17 वर्षे वयोगटात भाला फेक मध्ये प्रथम=
5.फरहान शेख……… 17 वर्षे वयोगटात थाळी फेक मध्ये प्रथम=
6.वेदांत जायभाय…… 14 वर्षे वयोगटात थाळी फेक मध्ये द्वितीय.
7.यश हाळनोर …….. 19 वर्षे वयोगटात लांब उडी मध्ये तृतीय=
विद्यालयाच्या मानाच्या शिरपेच्यात मैदानी क्रीडा स्पर्धेतून मानाचा तुरा रोवला आहे.
त्या यशस्वी विद्यार्थ्यांचे दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड अध्यक्ष उद्धवराव देशमुख,उपाध्यक्ष दिलीप गुगळे,सचिव अरुणशेठ चिंतामणी,सहसेक्रेटरी डॉक्टर सुनील कटारिया, खजिनदार शरद देशमुख सर्व संचालक प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने,पर्यवेक्षक अनिल देडे सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.सर्वांनी यशस्वी विद्यार्थी व क्रीडा मार्गदर्शक राघवेंद्र धनलगडे, प्रल्हाद साळुंखे, धीरज पाटील, बापू जरे यांचेही अभिनंदन केले.