जामखेडमध्ये महिलाराज, नगराध्यक्षा पदाच्या आरक्षणानंतर पंचायत समिती सभापती पण ओबीसी महिला
जिल्ह्यातील 13 पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत आज मंगळवार (दि. 7) रोजी नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. या आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारणसाठी 3, सर्वसाधारण महिलांसाठी 3, ओबीसीसाठी 2 आणि ओबीसी महिलेसाठी 2, तसेच अनुसूचित जाती व जमाती (महिलेसह) 3 पदे हे सभापतीपदाचे आरक्षण हे चिठ्ठ्याव्दारे काढण्यात आले जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली.
पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण राज्य पातळीवरून निश्चित करण्यात आलेले आहे. या प्रवर्गनिहाय आरक्षणात नगर जिल्ह्यात 14 पैकी अकोले पंचायत समिती ही अनुसूचित जमातीसाठी राखीव राहणार आहे.
तर उर्वरित 13 पंचायत समितीच्या अनुसूचीत जाती महिलेसह, ओबीसी महिलेसह आणि सर्वसाधारण महिलेस आरक्षणाची सोडतीची आज निश्चित होणार आहे. यात अनुसूचित जातीसाठी 1 अनुसूचित जाती महिलेसाठी 1, अनुसूचित जमाती महिलेसाठी 1, नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी 2, नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलेसाठी 2, सर्वसाधारण प्रवर्ग 3 आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी 3 असे आरक्षण काढण्यात येणार आहे.
जामखेड पंचायत समितीसाठी सहा गण आहेत. शिऊर, साकत, खर्डा, दिघोळ, जवळा, अरणगाव असे सहा गण आहेत. आज झालेल्या पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण सोडतीत महिला ओबीसी साठी आरक्षण निघाले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत दिनांक : ७ ऑक्टोबर २०२५ वेळ : दुपारी १२ वाजता स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, पंडित नेहरू सभागृह येथे काढण्यात आले आहे.
ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास प्रवर्ग व महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित. नागरिकांनी सोडत बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले होते.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती आरक्षण खालील प्रमाणे 1. संगमनेर – अनुसूचित जाती व्यक्ती 2. कोपरगाव – अनुसूचित जमाती महिला 3. श्रीरामपूर – सर्वसाधारण व्यक्ती 4. शेवगाव – सर्वसाधारण 5. राहुरी – सर्वसाधारण 6. पारनेर – सर्वसाधारण महिला 7. श्रीगोंदा – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 8. कर्जत – नागरिकांचा मागासवर्ग व्यक्ती 9. राहता – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 10. नेवासा – नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती 11. पाथर्डी – अनुसूचित जाती महिला 12. नगर – सर्वसाधारण महिला