महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांचे सुरू असलेले खाजगीकरण, इतर धोरणात्मक विषय व निवृत्ती वेतन लागू करण्यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने 9 ऑक्टोबर 2025 रोजी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. जामखेड तालुक्यातील सर्व कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.
9 संघटनेचा संप चालू आहे चौथा टप्पा आहे व बाकीच्या राहिलेले पण संघटना संप चालू आहे त्यांचा पण पहिला टप्पा चालू आहे त्यांचं आज पहिला टप्पा1/10/25 चालू आहे.
क्रमबद्ध आंदोलन चौथा टप्पा नुसार आज दिनांक 1/10/25 रोजी जामखेड उपविभागामध्ये 1.30 वाजता गेट मीटिंग घेण्यात आली गेट मीटिंगमध्ये सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते तसेचशिवाजी कदम सचिन चोरगे लखन फाळके भरत नाईकनवरे सुभाष वाघ व सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
9.10.11 तारखेला 72 तासाचा संप आहे
यावेळी बोलताना सचिनजी चोरगे म्हणाले की कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही संप करत आहोत. सर्व कर्मचारी संपात सहभागी आहेत लखन फाळके व शिवाजी कदम यांनी आभार मानले
या आहेत मागण्या
महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीच्या खाजगीकरणाला विरोध महावितरण एकतर्फी पुनर्रचनेला विरोध राज्य शासनाने सुरू केलेली पेन्शन योजना लागू करावी पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करावे रिक्त पदे भयती करावित कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करावे यासह विविध मागण्यासाठी संप पुकारण्यात येणार आहे.
आंदोलन या प्रमाणे 6 आक्टोबर मुख्य अभियंता यांच्या दारात ठिय्या आंदोलन 7 आक्टोबर झोन मंडळ विभाग कार्यालयासमोर द्वारसभा 9 आक्टोबर ते 11 आक्टोबर तीन दिवसांचा 72 तासांचा संप करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.