कुत्रे आडवे आल्याने क्रुझर पलटी होऊन तीघे जखमी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जखमींना दाखल केले दवाखान्यात

0
2191

जामखेड न्युज—–

कुत्रे आडवे आल्याने क्रुझर पलटी होऊन तीघे जखमी

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जखमींना दाखल केले दवाखान्यात

जामखेड परिसरात मोकाट जनावरे भटके कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव आहे. कुत्र्यांच्या चाव्यामुळे तसेच गाड्यांना आडवे येऊन अनेक अपघात होतात. असाच अपघात शहरापासून जवळच कर्जत
रोडवर कुत्रे आडवे आल्याने क्रुझर पलटी होऊन तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना ताबडतोब ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे दाखल करण्यात आले आहे.

रविवार दि. ५/१०/२०२५ रोजी जामखेड शहराजवळ कर्जत रोडवर कुत्रे आडवे आल्याने (कुत्रे तर जागेवरच मरण पावले आहे) क्रूजर गाडी पलटी होऊन तीन जण जखमी झाले. 

या जखमी मध्ये ड्रायव्हर अन्सार हसन शेख (वय ३६) रा. राजुरी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर तसेच नजीर फकीर मोहम्मद सय्यद (वय ५०) खडकत ता. आष्टी जिल्हा बीड, बाबा कादर शेख (वय ७२) खडकत ता. आष्टी जिल्हा बीड असे असून या तिघांना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपल्या रुग्णवाहिकेत जामखेड येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले आहे.

जामखेड मध्ये बरेच अपघात जनावरामुळे आणि कुत्र्यांमुळे होतात असे कोठारी म्हणाले कोठारी यांना तलाठी ऑफिस मधील प्रवीण सरोदे यांनी आणि भाऊसाहेब पोटफोडे यांनी फोनवर अपघाताची माहिती दिली कोठारी यांनी ताबडतोब आपले सहकारी महेंद्र शिरसागर यांना घटनास्थळी नेऊन जखमींना दवाखान्यात दाखल केले त्यांची तब्येत स्थिर आहे.

यावेळी उपस्थितान मधील म्हणाले अपघातातील हजारो लोकांचे प्राण वाचवणारे सामाजिक कार्यकर्ते संजय काका कोठारी हे फोन केल्याबरोबर रात्री बे रात्री सुद्धा पाच मिनिटात हजर होतात आणि जखमींना दवाखान्यात दाखल करून त्यांचे प्राण वाचवतात त्याबद्दल त्यांचे त्यांनी आभार मानले.

सदरची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिली असून कुत्र्याचा आणी जनावराचा बंदोबस्त करावा असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here