शिवछत्रपती बचत गटामार्फत विंचरणा विद्यालयास साहित्य भेट
शाळेच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करणार – बापुराव ढवळे
गावची शाळा व आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेविषयी कृतज्ञता म्हणून बचतगटाच्या माध्यमातून शाळेस मदत करण्यासाठी माजी विद्यार्थी समोर आले व शाळेसाठी मदत केली आहे. या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांनी व शाळेने स्वागत केले आहे. तसेच शाळेसाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल असे भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे यांनी सांगितले.
जामखेड तालुक्यातील श्री विंचरणा विद्यालय पिंपरखेड विद्यालयास पिंपरखेड येथील माळवस्ती व चोरगे वस्ती यांच्या मार्फत सुरू असलेल्या शिवछत्रपती बचत गट मार्फत 16 खुर्च्या 1 कॉम्प्युटर टेबल व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा विद्यालयास सप्रेम भेट देण्यात आल्या.
या मुळे विद्यालयातील खुर्च्या व टेबल यांचा प्रश्न मार्गी निघाला. या प्रसंगी गावचे सरपंच श्री राजेंद्र ओमासे, माजी सरपंच व जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष श्री बापुराव ढवळे,संस्थेचे अध्यक्ष श्री दिंगबर ढवळे, महावितरणचे अधिकारी श्री सचिन चोरगे साहेब, बचत गटाचे अध्यक्ष श्री आजिनाथ भोळे व बचत गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी श्री बापुराव ढवळे यांनी शाळेचा विकास करण्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. बचत गटाचे मार्गदर्शक आणि विद्यालयाचे माजी विद्यार्थी सचिन चोरगे यांनी बचत गटाने आतापर्यंत केलेले समाजकार्य सर्वांना सांगितले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री दिंगबर ढवळे यांनी शाळेत राबविले जात असलेले उपक्रम व केलेले कामे निदर्शनास आणून दिले व बचत गटाचे आभार मानले.
या प्रसंगी गावातील ग्रामस्थ व बचत गटातील सर्वच्या सर्व 38 पदाधिकारी हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री खताळ सर यांनी केले व श्री मुजावर सर, ससाणे सर. श्री काळाने सर श्री वेल्हाळ सर यांनी सर्वांचे आभार मानले