Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या नगरपरिषद निवडणुकीत आशिर्वाद द्या, पाणी रस्ते सर्व सुविधा मिळतील – सभापती प्रा...

नगरपरिषद निवडणुकीत आशिर्वाद द्या, पाणी रस्ते सर्व सुविधा मिळतील – सभापती प्रा राम शिंदे अमित चिंतामणी शहराचा सांस्कृतिक वारसा जतन करत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या गर्दीत ओपन गरबा दांडिया कार्यक्रम संपन्न

0
749

जामखेड न्युज—–

नगरपरिषद निवडणुकीत आशिर्वाद द्या, पाणी रस्ते सर्व सुविधा मिळतील – सभापती प्रा राम शिंदे

अमित चिंतामणी शहराचा सांस्कृतिक वारसा जतन करत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या गर्दीत ओपन गरबा दांडिया कार्यक्रम संपन्न

शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणला तरीही जनतेने मला काठावर पराभूत केले. तरीही मी नाराज नाही नशिबाने सभापती झालो आता नगरपरिषद निवडणुकीत आशिर्वाद द्या शहरवासीयांना रस्ते, पाणी, भुमिगत गटार यासर्व सुविधा उपलब्ध करु देऊ असे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

शुक्रवार दि. ३ आक्टोबर रोजी सायंकाळी प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी व विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत ओपन गरबा दांडिया कार्यक्रम जामखेड महाविद्यालय जामखेड येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने माताभगिनी उपस्थित होत्या. 

यावेळी विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे, प्रमुख आकर्षण सिने कलाकार प्राजक्ता माळी,प्रा. मधुकर राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, पोपट (नाना) राळेभात, मनोज कुलकर्णी, डॉ. भगवानराव मुरूमकर, संतोष गव्हाळे, अमित चिंतामणी मित्रमंडळ, पवन राळेभात, यावेळी प्रांजल चिंतामणी, अर्चनाताई राळेभात, संजिवनी पाटील, वैशाली झेंडे, संगिता पारे, उद्धव हुलगुंडे, श्रीराम डोके, तात्याराम पोकळे, कांतीलाल वराट, अँड प्रविण सानप, केदार रसाळ, सचिन मासाळ, संजय राऊत, भरत जगदाळे, प्रविण होळकर, फिरोज कुरेशी, दिपाली गर्जे, ऋषिकेश खरात, अँड. संजय पारे, अझहर काझी, मुक्तार सय्यद, मोहन पवार, अमित जाधव, राहुल बेदमुथ्या, प्रविण चोरडिया, गुलशन अंधारे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, नगरपरिषद निवडणुकीत काम करणाऱ्यांना संधी द्या म्हणजे शहराचा पाणीपुरवठा भुमीगत गटार योजना लवकर मार्गी लागेल. अन्यथा शहरातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ शकतो. तसेच सध्या अतिवृष्टीने शेतकरी हैराण आहेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. दिवाळीच्या आगोदर मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

यावेळी बोलताना सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाल्या अमित चिंतामणी यांचा कार्यक्रम खासच आहे. मी आतापर्यंत हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम केले पण कोठेही महाराष्ट्र गीत व गणपती च्या आरतीने कार्यक्रम सुरू झालेला नाही एकमेव जामखेड चा कार्यक्रम आहे. अमित चिंतामणी यांनी जामखेड करांची मने जिंकली आहेत. कोरोना काळातील काम उल्लेखनीय आहे. लोकांना अडीअडचणीच्या काळात अमित भाऊ मदत करण्यासाठी सर्वात पुढे असतात.

घरातील महिला खुश तर कुटुंब खुश!!!
घरातील महिलांना नेहमी खुश ठेवा तरच कुटुंब खुश राहते. अमित चिंतामणी यांच्या प्रेमाखातर जामखेड महाविद्यालय खचाखच भरले आहे. कार्यतत्पर नगरसेवक म्हणून अमित चिंतामणी यांनी आपली ख्याती निर्माण केली आहे.

प्रा मधुकर राळेभात म्हणाले की, अमित चिंतामणी यांनी अकरा वर्षे शहराचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे काम केले आहे. हे कार्यक्रम अखंडपणे सुरू राहावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी बोलताना आयोजन अमित चिंतामणी म्हणाले की, अकरा वर्षापूर्वी आम्ही दोनशे महिलांवर आम्ही कार्यक्रम सुरू केला आता पाच हजार पेक्षा जास्त महिला उपस्थित आहेत. दरवर्षी असाच प्रतिसाद मिळत आहे. हे सर्व सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मैत्री निभावणारे नेते म्हणून शिंदे यांची ख्याती आहे. आजही आपल्या जुन्या मित्रांना शिंदे साहेब विसरत नाहीत. यामुळे आम्ही पण जमिनीवर काम करत आहोत. गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात आम्ही सतत असतो. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे यांनीही शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गरबा – दांडिया चे देखील उत्कृष्ट नियोजन करण्यात आलेले होते, ज्यामध्ये हजारो युवक – युवतींसह सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उत्सवाचे वातावरण आनंद, भक्ती व उत्साहाने भारावून गेलेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!