जि. प. गट, प. स. गण आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला, ३ नोव्हेंबरला आरक्षण अंतिम होणार

0
331

जामखेड न्युज—–

जि. प. गट, प. स. गण आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला, ३ नोव्हेंबरला आरक्षण अंतिम होणार

 

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समित्या यांच्या गट व गणांचा आरक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाची सोडत दि. १३ ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद गटांची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समिती गणांची सोडत संबंधित तहसीलदारांतर्फे काढली जाईल. राज्य शासनाने चक्राकार (फिरते) आरक्षण पद्धत रद्द करत लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षण निश्चितीची ही पहिलीच निवडणूक ठरली.

या निर्णयाला नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. या संदर्भातील सर्व याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला. यामुळे गट व गणांचे आरक्षण जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला.

त्यानुसार या आरक्षण सोडत प्रक्रियेला ६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी गट-गणनिहाय आरक्षण अंतिम होणार आहेत.

असा आहे आरक्षण कार्यक्रम
६ ऑक्टो. : जिल्हाधिकाऱ्यांनी अनु. जाती व अनु. जमाती यांच्या जागा निश्चित करून प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करणे

८ ऑक्टो. : विभागीय आयुक्तांनी राखीव जागांच्या प्रस्तावास मान्यता देणे

१० ऑक्टो. : जिल्हाधिकारी यांनी आरक्षण सोडतीची अधिसूचना प्रसिद्धी करणे

१३ ऑक्टो. : जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद गट व तहसीलदार यांनी पंचायत समिती गणांची आरक्षणाची सोडत काढणे

१४ ऑक्टो. : जिल्हाधिकारी यांनी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे

१४ ते १७ ऑक्टो. जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी

२७ ऑक्टो. : जिल्हाधिकारी यांनी प्राप्त हरकती व सूचना अभिप्रायासह गोषवारा विभागीय आयुक्त यांना सादर करणे

३१ ऑक्टो. : विभागीय आयुक्त यांनी आरक्षण अंतिम करणे

३ नोव्हेंबर : अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here