Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमी उत्सव, शस्त्रपूजन व भव्य पथसंचलन यशोवर्धन वाळिंबे...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमी उत्सव, शस्त्रपूजन व भव्य पथसंचलन यशोवर्धन वाळिंबे प्रमुख वक्ते राहणार

0
430

जामखेड न्युज—–

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमी उत्सव, शस्त्रपूजन व भव्य पथसंचलन

यशोवर्धन वाळिंबे प्रमुख वक्ते राहणार

 

राष्ट्राच्या उत्कर्षासाठी सामान्य लोकांच्या संघटित प्रयत्नाने आणि सामुदायिक आचरणाने केलेल्या योगदानाची ओळख संघ स्वयंसेवक नेहमीच देत असतात.

प्रतिवर्ष प्रमाणे याही वर्षी जामखेड शहरात विजयादशमी उत्सवानिमित्त शस्त्रपूजन व भव्य संचलन गुरुवार दि. ०९ ऑक्टो २०२५ रोजी होणार आहे. पथसंचलन गणपती मंदिर बाजार समिती येथून दुपारी ४.०० वा निघेल व महावीर मंगल कार्यालय येथे ठीक सायं ६.०० वा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव साजरा होई.

नुकतेच या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले स्थापनेचे १०० वे वर्ष साजरे करत आहे आणि याच पार्शभूमीवर संघ समजाच्या उन्नतीसाठी पंचपरिवर्तन बिंदू जसे की, सामाजिक समरसता, पर्यावरण, नागरी कर्तव्ये, कुटुंब प्रबोधन व स्वदेशी या मुद्द्यावर पुढील काळात समाजासमोर हे बिंदू समोर ठेऊन काम करत आहे.

यातून समाज व राष्ट्राची उन्नती हे ध्येय उराशी बाळगून संघ काम करत आहे. यामुळे होणाऱ्या विजयादशमी उत्सवत समाजतील प्रत्येक घटकाने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

या उत्सवानिमित्त प्रमुख पाहुणे श्रीमती. सीमाताई कुंदन गायकवाड(स्वच्छता दूत,नगरपरिषद जामखेड) व निवृत्त कॅप्टन श्री.लक्ष्मण भोरे हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते यशोवर्धन वाळिंबे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारक असणार आहेत.

हे पथसंचलन वैचारिक भेद व भिंती तोडून, वैचारिक सीमोल्लंघन करून, हिंदू म्हणून एक होण्याचे, हिंदूंच्या संघटीत शिस्तबद्ध शक्ती प्रदर्शनाचे आपणही साक्षीदार व्हावे असे आवाहन श्री.बाळासाहेब दळवी (ता. कार्यवाह ) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!