अनाधिकृत बॅनर लावल्यास गुन्हे दाखल होणार जामखेड शहरातील अनाधिकृत डिजिटल बॅनरवर कारवाईसाठी मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक रस्त्यावर

0
642

जामखेड न्युज—–

अनाधिकृत बॅनर लावल्यास गुन्हे दाखल होणार

जामखेड शहरातील अनाधिकृत डिजिटल बॅनरवर कारवाईसाठी मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक रस्त्यावर

जामखेड शहरातील लावण्यात आलेल्या अनाधिकृत डीजीटल बॅनर व फलकांमुळे शहरातील विद्रूपीकरण वाढत चालले आहे. या लावण्यात आलेल्या अनाधिकृत डीजीटल बॅनरवर जामखेड नगरपरिषद व पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. यावेळी मुख्याधिकारी अजय साळवे व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून ही कारवाई केली आहे. या कारवाईचे नागरीकांनी स्वागत केले आहे.

जामखेड शहरातील रस्त्यांच्या कडेला विविध ठिकाणी राजकीय, कमर्शियल पोस्टर, व्यावसायिक बॅनर, शुभेच्छा बॅनर, सह इतर अनाधिकृत बॅनर लावण्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे शहराचे विद्रूपीकरण वाढले होते. त्यामुळे जामखेड नगरपरिषद व पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या अनाधिकृत डीजीटल बॅनरवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले की जामखेड शहरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना अनाधिकृत बॅनर लागले होते.

याबाबत व्यापारी व बॅनर लावणार्‍या संबधित नागरीकांना बॅनर लावण्यासाठी परवानगी घ्यावी अशा सुचना दिल्या होत्या मात्र ते परवानगी घेत नव्हते. तसेच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे अनाधिकृत बॅनर काढण्याचे आदेश आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी विद्रूपीकरण वाढत चालले आहे. तसेच येथुन पुढे विनापरवानगी बॅनर लावले तर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी बोलताना सांगितले की जामखेड शहरात कालपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहराचे विद्रूपीकरण वाढत चालले आहे. बॅनरवरुन अनेक ठिकाणी वाद होतात. अहिल्यानगर या ठिकाणी देखील बॅनरवरुन एक घटना घडली आहे. त्यामुळे नागरीकांनी परवानगी घेऊन बॅनर लावावेत तसेच ही मोहीम येथुन पुढे सारखी चालुच रहाणार आहे.

रस्त्यावर व्यापार्‍यांनी लावलेल्या आडव्या पाट्या देखील काढुन घ्याव्यात तसेच विनापरवाना डीजीटल बॅनर लावले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे देखील पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सांगितले.

कारवाई दरम्यान जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, नगरपरिषदचे कार्यालय अध्यक्ष संभाजी कोकाटे, पाणी पुरवठा व आरोग्य विभाग ज्ञानेश्वर मिसाळ, कवादे साहेब, निरीक्षक घोडेकर, अभियंता इंजिनिअर अमिर शेख, ढवळे साहेब, सुरज मोहिते, संतोष पवार, प्रमोद टेकाळे, विजय पवार, हितेश वीर, प्रणित सदाफुले, अतुल कोकाटे, राजेंद्र गायकवाड, किरण भोगे, तुषार केवडे, लक्ष्मण माने आदी कर्मचारी स्टाप उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here