जामखेड तालुक्यात पावसामुळे वृध्द महिलेचा मृत्यू, नऊ जनावरे दगावली, अनेक घरांची पडझड
गेल्या पाच सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे एकच हाहाकार उडाला आहे. अनेक रस्ते पुल पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावे वाड्या वस्त्या यांचा संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे घरांच्या भिंती ओल्या झाल्याने कोसळत आहेत. तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे भिंत अंगावर कोसळून एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे तर नऊ जनावरे दगावली आहेत.
तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे किसन गव्हाणे व पारूबाई किसन गव्हाणे पती पत्नी आपल्या पत्र्याच्या घरात झोपले होते. सतत पाऊस चालू असल्याने शेजारच्या जून्या इमारतीचा भीतीचा भाग त्यांच्या पत्र्याच्या घरावर कोसळला. यामुळे पत्रे तसेच मैला खाली आला तो पारूबाई यांच्या अंगावर पडला यात पारूबाई गंभीर जखमी झाल्या ताबडतोब त्यांना जामखेड येथे दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पारूबाई किसन गव्हाणे वय ७५ यांच्या अंगावर शेजारच्या घराची भिंत पडल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना तातडीने रात्री 12:00 वाजता जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलला उपचारासाठी आणले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले.
त्यांनंतर ग्रामीण रुग्णालयात डॉ.शशिकांत शिंदे यांनी रात्रीच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेची माहितीगणेश जगताप यांनी मंडल अधिकारी इकडे मँडमला दिली तलाठी विकास मोराळे व सर्कल इकडे मँडम हे तातडीने दवाखान्यात पोहचले घटनेची माहिती घेतली व तहसीलदार पाडळे यांना कळविले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जामखेड तालुक्यात गेल्या पाच सहा दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. तालुक्यात सर्वच मंडळात सरासरी ओलांडली आहे. यामुळे आगोदरच ओव्हरफ्लो असलेली धरणे, नद्या, ओढे यांचे पाणी शेतात शिरलेले आहे. पीके पाण्यात आहेत तर मोठ्या प्रमाणावर रस्ते उखडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खैरी नदीला पूर आला आहे दरडवाडीचा पूल बंद आहे. तसेच आनंदवाडी चा पूल बंद आहे. यामुळे जामखेड तुळजापूर वाहतूक मार्ग बंद आहे.बांधखडकचा पूल वाहून गेला आहे त्यामुळे संपर्क तुटला आहे. यामुळे तालुक्यातील पावसाने दैनिय अवस्था झाली आहे. नाहुली भिलारे वस्ती पुल वाहून गेला आहे. राजुरी येथून पिंपळगाव आळवा, पिंपळगावउंडा कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी होते. जामखेड तुळजापूर रस्ता ही पाण्यात होता. शेती, पीके, पशुधन याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
तालुक्यात नऊ जनावरे दगावली आहेत. लेहनेवाडी येथील शेतकरी शरद प्रभाकर पवार यांच्या ७ शेळ्या मृत्यूमुखी भवरवाडी येथील पोपट अण्णा शिंदे यांची गायवाहून गेली तर मोहा येथील कैलास सजगणे यांची १ मेंढी ओढ्यात वाहून गेलीआहे. अनेक घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांत पाणी शिरल्याने जीवनावश्यक
पिंपळगाव उंडा, सावरगाव, घोडेगाव, खुरदैठण, मोहरी, राजुरी, शिऊर, मुंजेवाडी, वंजारवाडी, तरडगाव, वाघा यासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाली तर अनेक घरात पाणी शिरले असल्याने जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले आहे. जवळके येथील हनुमान मंदिर पाण्यात गेले आहे. जोरदार पाऊस सुरूच आहे.