जामखेड येथे भाजपा कार्यालयात पं. दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी
सेवा पंधरवड्यात शहरातील श्री लोहार देवी येथे वृक्षारोपण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याच्या उपक्रमांतर्गत आज दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता एकात्म मानवतावाद व अंत्योदयाचे प्रणेते प्रखर राष्ट्रवादी विचारवंत तसेच जनसामान्यांचे प्रेरणास्रोत वंदनीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने श्री लोहार देवी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात, सोमनाथ राळेभात, प्रवीण चोरडिया, उद्धव हुलगुंडे (संयोजक) संजय काका काशिद भाजपा अध्यक्ष (शहर मंडल जामखेड) हज कमिटी सदस्य सलीम बागवान, बाजार समितीचे माजी संचालक पोपट राळेभात, अनिल यादव, नगरसेवक मोहन पवार, गणेश आजबे, प्रविण होळकर,अर्जुन म्हेत्रे, डॉ. विठ्ठल राळेभात, अण्णासाहेब ढवळे, प्रविण बोलभट, उद्धव हुलगुंडे, शिवाजी येवले, ज्ञानेश्वर अंदुरे, महेश निमोणकर,बापू बोराटे,संजय लोहार,तुषार जगदाळे,अमोल लोहार,सचिन लोहार,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ योजनेचा लाभ घ्यावा.
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेश उपलब्ध करून देण्यात येतो. तसेच वसतीगृह योजनेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी वेळापत्रकानुसार अर्ज सादर करावेत,असे आवाहन भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी केले आहे.
१२ वी नंतर व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत.
३० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान अर्जांची छाननी केली जाईल. गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत १६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत राहील.
रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांपैकी गुणवत्तेनुसार दुसरी निवड यादी १७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.