आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

0
209
जामखेड न्युज – – – 
आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच लोणावळ्याजवळील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक श्री. बालाजी तांबे (वय ८१) यांचे निधन. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले.
      त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल आणि संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे. तांबे यांच्यावर मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्प  आणि ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्टर’ या पुरवणीच्या माध्यमातून आरोग्य विषयक जागृती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here